Monday, August 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

शिक्षक भरतीसाठी मोठी संधी; जळगाव जिल्ह्यात ९५३ पदे भरणार, टीएआयटी उमेदवारांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 17, 2026
in नोकरी
0
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात
बातमी शेअर करा..!

जळगाव जिल्ह्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील मिळून तब्बल ९५३ शिक्षक पदे भरली जाणार आहेत.

यामध्ये प्राथमिक विभागातील ४५६, तर माध्यमिक विभागातील ४९७ पदांचा समावेश आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TAIT-2025 मध्ये सहभागी झालेल्या पात्र उमेदवारांना या भरती प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे शिक्षक पदासाठी तयारी करणाऱ्या तरुणांना मोठी संधी मिळाली आहे.

प्राथमिक विभागात ४५६ पदे

प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त पदांमध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या जागांचा समावेश आहे. मराठी माध्यमासाठी २५१ पदे, तर उर्दू माध्यमासाठी २०५ पदे उपलब्ध आहेत. मराठी माध्यमातील जागांमध्ये इयत्ता १ ली ते ४ थी/५ वीकरिता १२६ पदे आहेत. तसेच इयत्ता ६ वी ते ८ वीकरिता गणित-विज्ञान विषयाची ८३, इंग्रजी विषयाची २०, मराठी विषयाची ११ आणि हिंदी विषयाची ११ पदे भरण्यात येणार आहेत.उर्दू माध्यमात इयत्ता १ ली ते ४ थी/५ वीकरिता १५० पदे असून, इयत्ता ६ वी ते ८ वीकरिता गणित-विज्ञान विषयाची ३७ आणि उर्दू भाषा विषयाची १८ पदे उपलब्ध आहेत.

माध्यमिक विभागातील ४९७ जागांवर भरती

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील रिक्त शिक्षक पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार १३८ माध्यमिक शाळांमध्ये एकूण ४९७ पदे रिक्त आहेत. या पदांवरही भरती केली जाणार असल्याने प्राथमिकसह माध्यमिक स्तरावरील उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.

कोणते उमेदवार पात्र?

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असणे आवश्यक आहे. इयत्ता १ ली ते ५ वी तसेच इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शिक्षक पदांसाठी संबंधित TET/CTET पात्रता पूर्ण असणे गरजेचे आहे. यासोबतच TAIT-2025 परीक्षेत सहभागी होणे आणि पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

अर्ज करताना काळजी घेणे आवश्यक

पवित्र प्रणालीवर अर्ज भरताना उमेदवारांनी आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, आरक्षण प्रवर्ग, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अचूकपणे नमूद करावी. अर्जातील माहितीमध्ये चूक किंवा अपूर्णता राहणार नाही, याची उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, रिक्त पदांचा आरक्षणनिहाय आणि समांतर आरक्षणाचा तपशील जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत माहिती तपासूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. एकाच वेळी ९५३ शिक्षक पदांची भरती होणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांना..; त्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचे जोरदार प्रत्युत्तर

Next Post

शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

August 17, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

शिक्षक भरतीसाठी मोठी संधी; जळगाव जिल्ह्यात ९५३ पदे भरणार, टीएआयटी उमेदवारांना संधी

August 17, 2026
मंत्री गिरीश महाजनांची संजय राऊतांवर सडकून टीका ; म्हणाले

संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांना..; त्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचे जोरदार प्रत्युत्तर

August 17, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट, जळगावात काय स्थिती?

August 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page