Thursday, July 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home वाणिज्य

तिसरी भाषा नववीऐवजी सहावीपासूनच सुरू करा; त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 16, 2026
in वाणिज्य, शैक्षणिक
0
तिसरी भाषा नववीऐवजी सहावीपासूनच सुरू करा; त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली | सीबीएसई शाळांमध्ये नववी इयत्तेपासून त्रिभाषा धोरण लागू करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत, तिसरी भाषा नववीऐवजी सहावी इयत्तेपासून शिकविण्याचा विचार करावा, अशी सूचना केंद्र सरकारला केली आहे. नववीत नवीन भाषा सुरू केल्यास दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर तामिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान ही निरीक्षणे नोंदवण्यात आली. ही याचिका राज्यातील जवाहर नवोदय विद्यालयांच्या स्थापनेसंदर्भातील आणि त्या शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या त्रिभाषा धोरणाशी संबंधित आहे.

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नागरत्ना यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, नववी ही दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी सुरू होण्याची महत्त्वाची इयत्ता आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांवर नवीन भाषा शिकण्याचा ताण टाकणे योग्य नाही. त्याऐवजी तिसरी भाषा सहावीपासून सुरू केल्यास विद्यार्थ्यांना ती आत्मसात करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

NEP मध्ये हिंदीची सक्ती नाही

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP) हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आलेली नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. राज्यभाषा, इंग्रजी आणि कोणतीही तिसरी भाषा शिकविण्याची मुभा धोरणात असून, हिंदीच शिकविण्याची सक्ती नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

यावेळी न्यायमूर्ती नागरत्ना यांनी तामिळनाडू सरकारला उद्देशून, “हिंदी नको असेल तर संस्कृत किंवा इतर कोणतीही भाषा शिकविण्यात काय अडचण आहे?” असा सवालही उपस्थित केला.खंडपीठाने तामिळनाडू सरकारला केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाला केवळ ते केंद्राचे आहे म्हणून विरोध करू नये, असा सल्लाही दिला. राज्याची स्वतंत्र शिक्षण व्यवस्था असू शकते, मात्र केंद्र सरकारच्या शाळांना त्यांचे धोरण राबविण्यापासून रोखू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

स्वतःचा शालेय अनुभव सांगितला

न्यायमूर्ती नागरत्ना यांनी आपल्या शालेय शिक्षणाचा अनुभव सांगताना, माध्यमिक स्तरापासूनच तिसरी भाषा शिकविली जात असल्याने विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपूर्वी भाषेचे चांगले ज्ञान मिळत असे, असे नमूद केले. एखादी भाषा जितक्या लवकर शिकण्यास सुरुवात होते, तितके विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरते, असेही त्यांनी सांगितले.

११ ऑगस्टला पुढील सुनावणी

तामिळनाडूमध्ये जवाहर नवोदय विद्यालयांच्या स्थापनेबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याचे न्यायालयाने नमूद केले. या चर्चेचा निकाल पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खाजगी सावकारी व्यवहारातून भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तिसरी भाषा नववीऐवजी सहावीपासूनच सुरू करा; त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

तिसरी भाषा नववीऐवजी सहावीपासूनच सुरू करा; त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

July 16, 2026
जळगाव गोळीबार प्रकरणात आठ जणांना घेतलं ताब्यात

खाजगी सावकारी व्यवहारातून भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

July 16, 2026
चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

July 16, 2026
‘मविआ’मध्ये वंचितला इतक्या जागा देणं शक्य ; शरद पवारांनी सांगितला आकडा

‘शरद पवारांनी एनडीएमध्ये यावे; प्रकाश आंबेडकरांनाही सत्तेत येण्याचे आवाहन, दिग्गज मंत्र्याच्या ऑफरने खळबळ

July 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page