Wednesday, September 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धावत्या ट्रॅव्हल्समधून २५ लाखांची रोकड लांबवणारी ‘टोळी’ गजाआड; चौघे जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 16, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
धावत्या ट्रॅव्हल्समधून २५ लाखांची रोकड लांबवणारी ‘टोळी’ गजाआड; चौघे जेरबंद
बातमी शेअर करा..!

जळगाव । धावत्या लक्झरी बसमधून तब्बल २५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी केवळ आरोपींनाच अटक केली नाही, तर चोरीला गेलेली २५ लाखांची संपूर्ण रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रुपये किमतीची मारुती डिझायर कार (MH-47-CU-7877) असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पारोळा येथील नितीन पुरुषोत्तम वाणी हे जळगावचे प्रसिद्ध सराफ व्यावसायिक प्रफुल्ल भागचंद सुराणा यांच्याकडे गेल्या १५ वर्षांपासून खासगी कुरिअरचे काम पाहतात. ११ जुलै २०२६ रोजी ते कोल्हापूर येथे चांदी खरेदीसाठी २५ लाख रुपयांची रोकड घेऊन ‘हरे कृष्णा ट्रॅव्हल्स’च्या बसने निघाले होते. सायंकाळी ८.३० च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथील ‘साई सुरुची लॉजिंग’जवळ बस जेवणासाठी थांबली. वाणी बॅग बसमध्येच ठेवून खाली उतरले. ते जेवण करून परत आले असता, त्यांना रोकडची बॅग गायब झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासाने आवळला आवळला पाश

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी सोनू उर्फ राम भगवान सारवाण (वय ३२, रा. गुरुनानक नगर, शनिपेठ, जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर तीन साथीदारांची नावे उघड केली.

सोनूच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याचे साथीदार शेख रहेमान शेख निसार (वय ३३, पिंप्राळा हुडको), सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे (वय ३८, कोल्हे नगर) आणि दशरथ सुरेश चौधरी (वय ३६, खंडेराव नगर) यांनाही बेड्या ठोकल्या. तपासात आरोपी शेख रहेमान याने या चोरीसाठी स्वतःची मारुती डिझायर कार दिली असल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपी सोनूबद्दल धक्कादायक माहिती समोर आली असून त्याच्यावर जळगाव शहर, शनिपेठ आणि भुसावळ रेल्वे पोलिसांत दरोडा, घरफोडी, चोरी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचे अनेक गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत.

या पथकाने केली कामगिरी

ही यशस्वी कारवाई एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, संतोष पवार, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील तसेच अंमलदार राहुल रगडे, प्रदीप सपकाळे, रवींद्र कापडणे आणि छगन तायडे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तिसरी भाषा नववीऐवजी सहावीपासूनच सुरू करा; त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Next Post

जळगाव नजीक भीषण अपघात; उभ्या ट्रकला कारची भीषण धडक; २ ठार, ४ गंभीर जखमी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

जळगाव नजीक भीषण अपघात; उभ्या ट्रकला कारची भीषण धडक; २ ठार, ४ गंभीर जखमी!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

अमृत महोत्सव सोहळ्याला भाजप नेत्यांची दांडी; एकनाथ खडसे म्हणाले…

September 2, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

भरधाव कारने तीन महिलांना उडवले; एकीचा जागीच मृत्यू, दोघी गंभीर

September 2, 2026
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय, या योजनांना दिली मंजूर, काय लाभ मिळेल?

केंद्र सरकारमध्ये मोठ्या फेरबदलाची चर्चा; 16-17 नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

September 2, 2026
तरुणांसाठी सुवर्णसंधी! पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; ३१ हजारांहून अधिक संधी उपलब्ध

जळगावातील बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर; नामांकित कंपन्यांत इंटर्नशिपची संधी

September 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page