Monday, October 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

ज्ञानेश कुमार विरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी; काय घडलं कोर्टात?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 5, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अधिकारांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या युक्तिवादाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. मात्र, या प्रकरणात अंतरिम आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला.

विकास सिंह यांनी युक्तिवाद करताना २०२३ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांना अधिक अधिकार मिळाल्याचा दावा केला. सध्या मुख्य निवडणूक आयुक्त हे इतर संवैधानिक प्राधिकरणांपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच, त्यांच्या निर्णयांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला.

सुनावणीदरम्यान ज्ञानेश कुमार यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणीही विकास सिंह यांनी केली. त्यांच्याकडे पंतप्रधानांपेक्षाही अधिक सुरक्षा असल्याचा दावा त्यांनी केला. यावर न्यायमूर्ती जे. बागची यांनी, “त्यांना हटवलं तर निवडणुका कोण घेणार?” असा सवाल केला. त्यावर विकास सिंह यांनी निवडणूक आयोगातील अन्य दोन आयुक्त निवडणुका घेऊ शकतात, असे सांगितले. तसेच आयोगातील निर्णय सर्वसंमतीने घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावर मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी, सर्वसंमतीने निर्णय होत नसतील तर नियमांनुसार बहुमताच्या आधारावर निर्णय होऊ शकतो, असे स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान एका वृत्तपत्रातील बातमीचा संदर्भ दिल्यावर CJI सूर्यकांत यांनी त्यावरही प्रश्न उपस्थित केला. त्यावर विकास सिंह यांनी निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आरोप स्पष्टपणे फेटाळलेले नसल्याचे म्हटले.

दरम्यान, “आम्हाला निवडणूक आयोगाची बाजूही ऐकावी लागेल,” असे न्यायमूर्ती जे. बागची यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावत त्यांची बाजू जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पदवीधरांसाठी सुप्रीम कोर्टात नोकरीची मोठी संधी; २५० पदांसाठी भरती, पगार ३५००० मिळेल

Next Post

नांद्री विकास मंचची प्रेरणादायी वाटचाल; जि.प. शाळेतील ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नांद्री विकास मंचची प्रेरणादायी वाटचाल; जि.प. शाळेतील ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

नांद्री विकास मंचची प्रेरणादायी वाटचाल; जि.प. शाळेतील ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

October 5, 2026
दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

October 5, 2026
पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

October 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page