आशिया खंडातील वाढत्या आंतरराष्ट्रीय तणावाचा फटका आता महाराष्ट्रालाही बसू लागला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असून पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी, “राज्यात महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा उपलब्ध आहे,” असे धक्कादायक विधान केले आहे. भुजबळ यांच्या या विधानामुळे आधीच चिंतेत असलेल्या सर्वसामान्यांची धडकी भरली असून राज्यात नव्या संकटाची चिन्हे निर्माण झाली आहेत.
आशियातील तणाव सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. अमेरिका-इराणची शांताता करार सहमती झाली नाहीये. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती अजूनही सामान्य नाहीये. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि एलपीजीच्या किमती लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत.
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील आज पु्न्हा इंधनाची दर वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, तेल, वायू किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाहीये. परंतु राज्यात होणारा पुरवठ्यात तुटवडा जाणवत आहे. राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यानं पंपावर हाणामारीच्या घटना घडत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातही इंधन टंचाईच्या संकटामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच ठिय्या मांडला होता. जालन्यातही भीषण इंधन टंचाई निर्माण झाल्याचं दिसून आले.अनेक पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक लागलेत. परभणी जिल्ह्यातही ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागलेले पाहायला मिळालेत.नांदेडमधील अनेक पंपावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. डिझेलचा साठा संपल्यानं वाहनचालक संकटात सापडलेत. मात्र त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं विधान धक्कादायक आहे.
पेट्रोल-डिझेल मिळत नाही, अशी तक्रार अजून आली नाहीये, असं भुजबळ म्हणालेत. राज्यातील काही पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरवठा पोहचवण्यास वेळ लागत असेल परंतु मिळतच नाही, अशी तक्रार अद्याप आली नाहीये. जर तक्रार आली तर त्यावर कारवाई करण्यात येईल. तर इंधन पुरवठ्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, राज्यात महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ९० पैशांची वाढ करण्यात आल्यानं नागरिकांना महागाईच्या मार सहन करावा लागत आहे.














Discussion about this post