Friday, October 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘ही’ योजना केली बंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 2, 2026
in महाराष्ट्र
0
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..
बातमी शेअर करा..!

मुंबई | राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. दरम्यान, फडणवीस सरकारने अल्पसंख्याक विकास विभागाशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अल्पसंख्याक विकास विभागामार्फत २०१६ पासून ही योजना राबविण्यात येत होती. या योजनेसाठी विभागाच्या एकूण निधीतून दरवर्षी सुमारे अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, मागील काही वर्षांतील योजनेच्या अंमलबजावणीचा आणि प्रत्यक्ष खर्चाचा आढावा घेतल्यानंतर ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने यासंदर्भात शासनादेश जारी केला आहे. शासन निर्णयानुसार, अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येणारी ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना या आर्थिक वर्षापासून बंद करण्यात येणार आहे.

दरम्यान, १५ जुलै २०१६ रोजी राज्यात एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या अभियानात अल्पसंख्याक विकास विभागासह विविध शासकीय विभागांचा सहभाग होता. त्यानंतर अल्पसंख्याक विकास विभागामार्फत वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्यात आली होती.

सरकारने गेल्या पाच आर्थिक वर्षांत प्रत्यक्ष खर्च २५ कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या योजनांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. अशा योजना बंद करणे किंवा त्यांचे एकत्रीकरण करण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्याक विकास विभागाच्या या योजनेचाही आढावा घेण्यात आला.

योजनेवरील मागील पाच वर्षांतील खर्च, सध्याच्या विविध योजनांचा आर्थिक भार, अल्पसंख्याक घटकांना दिले जाणारे अर्थसहाय्य, प्रस्तावित योजना आणि इतर आर्थिक दायित्वे यांचा विचार करून ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध भागांत पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. सुरुवातीला राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर वगळण्यात आलेल्या काही तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

Next Post

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू, २५ जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू, २५ जखमी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू, २५ जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कात CJPचे आंदोलन; गांधींचे टी-शर्ट घालून कार्यकर्ते सहभागी

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कात CJPचे आंदोलन; गांधींचे टी-शर्ट घालून कार्यकर्ते सहभागी

October 2, 2026
शिवाजी पार्कात अभिजीत दीपकेंचा एल्गार; गांधी, नेहरू, आंबेडकरांचा दाखला देत मोदींवर हल्लाबोल

शिवाजी पार्कात अभिजीत दीपकेंचा एल्गार; गांधी, नेहरू, आंबेडकरांचा दाखला देत मोदींवर हल्लाबोल

October 2, 2026
मोठी बातमी! MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली; सरकारचा शासन निर्णय जारी

मोठी बातमी! MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली; सरकारचा शासन निर्णय जारी

October 2, 2026
गावठी कट्टे-काडतुसे घेऊन जाताना पुण्याच्या तिघांना पकडले; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

गावठी कट्टे-काडतुसे घेऊन जाताना पुण्याच्या तिघांना पकडले; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

October 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page