Monday, July 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सोनम वांगचुक यांच्या उपचारांवरून वाद; पत्नीची दिल्ली हायकोर्टात धाव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 19, 2026
in राष्ट्रीय
0
सोनम वांगचुक यांच्या उपचारांवरून वाद; पत्नीची दिल्ली हायकोर्टात धाव
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आरोग्यस्थितीबाबत आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबत नवीन वाद निर्माण झाला आहे. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत पतीला खासगी रुग्णालयात हलविण्याची परवानगी मिळावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आंग्मो यांनी सफदरजंग रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय माहितीत विसंगती असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयाने सोनम वांगचुक यांच्या रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण २.९ असल्याचे सांगितले होते आणि ही स्थिती धोकादायक असल्याचेही नमूद केले होते. मात्र, अधिकृत आरोग्य बुलेटिनमध्ये हा आकडा न देता केवळ पोटॅशियमची पातळी कमी असल्याचे नमूद करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे

आंग्मो यांनी असा दावा केला की, वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सुमारे दहा तासांनी स्वतंत्र प्रयोगशाळेत रक्त तपासणीची परवानगी मिळाली. या तपासणीत पोटॅशियमचे प्रमाण ३.५ आढळून आले, जे सामान्य मर्यादेत असल्याचे त्यांनी सांगितले.

I have lost faith in Safdarjung Government Hospital.
The hospital told us @Wangchuk66’s potassium had dropped to 2.9, describing it as alarming and life-threatening. Yet, in its public health bulletin, it conveniently omitted the actual number, referring only to "decreasing…

— Gitanjali J Angmo (@GitanjaliAngmo) July 19, 2026

याशिवाय, सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यास किंवा त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यास प्रशासनाकडून परवानगी दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सांगत, ही परिस्थिती वैद्यकीय उपचारांपेक्षा नजरकैदेसारखी असल्याची टीकाही त्यांनी केली.

“सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही प्रतिकूल घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासन आणि रुग्णालय व्यवस्थापनाची असेल,” असे आंग्मो यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

या सर्व घडामोडींमुळे त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल केली असून, वांगचुक यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या आरोपांवर सफदरजंग रुग्णालय किंवा दिल्ली प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतात कागदी नोटा बंद होणार? RBI कडून ‘प्लास्टिक नोटा’ छापण्याच्या हालचालींना वेग!

Next Post

विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा बरसणार; हवामान विभागाकडून जळगावसह २० जिल्ह्यांना इशारा 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुंबईत पावसाचा कहर! राज्यात इतका पाऊस का वाढला? पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले कारण..

विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा बरसणार; हवामान विभागाकडून जळगावसह २० जिल्ह्यांना इशारा 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
यावलच्या हरिपुरा धरणात बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

यावलच्या हरिपुरा धरणात बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

July 20, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावरील निदेशक पद भरती

July 20, 2026
मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात मोठी पदभरती जाहीर ; त्वरित अर्ज करा

भाभा अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी भरती जाहीर; 44,900 पर्यंत वेतन मिळेल

July 20, 2026
सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ; २१ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर रुग्णालयात दाखल

….तरच मी उपोषण मागे घेईन ; सोनम वांगचुकांनी सरकारसमोर ठेवल्या या तीन महत्त्वाच्या अटी?

July 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page