Friday, September 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!

बोदवड–मुक्ताईनगरमध्ये थेट बांधावर जाऊन पीकस्थितीची पाहणी; अधिकाऱ्यांना वास्तवदर्शी अहवालाचे निर्देश

जळगाव | “पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातात अपेक्षित उत्पादन येणार नाही, ही वस्तुस्थिती आम्ही प्रत्यक्ष बांधावर पाहत आहोत. या संकटाच्या काळात शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. पालकमंत्री म्हणून मी आणि शासन शेतकरी व शेतमजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शासनाच्या निकषांनुसार मदतीस पात्र असलेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देणार नाही,” अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील पीकस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मका, कापूस आणि सोयाबीन पिकांची पाहणी केली. पिकांच्या स्थितीची पाहणी करतानाच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाचा खंड, उत्पादनात होणारी घट आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद करताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थितीवर आधारित माहिती प्रशासनाने शासनाकडे पाठवावी आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने करावी, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक येथील विभागीय बैठकीत जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांची पीकस्थिती कृषिमंत्र्यांसमोर मांडून, दीर्घ पावसाच्या खंडामुळे घटलेल्या उत्पादनाचा विचार करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

पाणीटंचाईची वाट पाहू नका; आतापासून नियोजन करा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संभाव्य पाणीटंचाईची पूर्वतयारी आतापासूनच करण्याचे निर्देश दिले. गावनिहाय जलस्रोतांचा आढावा घेऊन टंचाईग्रस्त भागांचा आराखडा तयार करावा, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी प्रशासनाने वेळेत नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले

वीज, पाणी आणि पशुधनाच्या प्रश्नांवर एकत्रित काम करा

महावितरण, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, कृषी आणि महसूल विभागांनी आपापल्या विभागापुरते मर्यादित न राहता समन्वयाने काम करावे. कृषिपंपांचा वीजपुरवठा, बंद रोहित्रे, पाणीपुरवठा योजना तसेच पशुधनासाठी आवश्यक पाणी याबाबत शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, याची काळजी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “संकट मोठे असले तरी तुम्ही एकटे नाही. तुमची परिस्थिती शासनापर्यंत पोहोचविणे आणि जास्तीत जास्त दिलासा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे ही आमची जबाबदारी आहे.

जिल्ह्यात शेतकऱ्याच्या पिकाबरोबरच त्याच्या पशुधनाची काळजी घेणेही आपली जबाबदारी आहे. पुढील काळात कोणत्याही भागात गंभीर चारा टंचाई निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने पशुसंवर्धन विभागाने आतापासून नियोजन करावे. बांधावरचे वास्तवच अहवालात दिसले पाहिजे’ बोदवड परिसरातील पाहणीदरम्यान पावसाच्या दीर्घ खंडाचा पिकांवर झालेला परिणाम पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहिला. विद्युत मोटारी, केबल आणि वीजतार चोरीच्या घटनांबाबतही पोलीस व महावितरण विभागाने संयुक्त कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी शेतकऱ्यांनी उत्पादनातील घट आणि आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही पावसाच्या खंडामुळे मतदारसंघातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे सांगत शेतकऱ्यांची वस्तुस्थिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले. मुक्ताईनगरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भरीव मदत देण्याची मागणी करत एकरी लाख रुपयांच्या मदतीचा आग्रह केला. शेतकऱ्यांना दिलासा मिळेपर्यंत ही मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरू. पालकमंत्रीही या प्रश्नासाठी शासनदरबारी ठामपणे पाठपुरावा करतील,’’ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

बैठकीच्या प्रारंभी मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी पीकस्थिती तसेच संबंधित विषयांचे सविस्तर सादरीकरण केले.

यांची होती उपस्थिती

यावेळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक नंदराज पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे, बोदवडचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, गटविकास अधिकारी कीर्ती कनवाडे, तालुका कृषी अधिकारी अभिजीत शिंदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता गोपाळ चव्हाण, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अतुल वराडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह माजी उपसभापती आनंदराव देशमुख, उपजिल्हाप्रमुख छोटूभाई, युवा सेनेचे पंकज राणे, अफसर खान, गोपाळ पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 25, 2026
निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

September 25, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगाव बसस्थानकातील चोरीचा छडा! निलंबित होमगार्ड जेरबंद

September 25, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

१२वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; १,६८८ पदांची भरती

September 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page