Friday, October 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांबाबतचे वादग्रस्त वक्तव्य भोवले! आमदार संजय गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 30, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
शेतकऱ्यांबाबतचे वादग्रस्त वक्तव्य भोवले! आमदार संजय गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई?
बातमी शेअर करा..!

मुंबई । शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिंदे यांनी गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत नेमकं काय म्हणाले गायकवाड?

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. नुकतेच त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यविधीला कुणीही जाऊ नये, असे विधान त्यांनी केले होते. शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. त्याला काही अडचणी असतील, तर त्याने आमदार किंवा खासदारांना चिठ्ठी लिहावी. आम्ही सर्वजण मिळून त्याची मदत करू, असे ते म्हणाले होते. शेतकरी कोणताही विचार न करता आत्महत्या करतात, असे म्हणत त्यांनी त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहू नये, अशी भूमिका मांडली होती. या वक्तव्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होण्याची शक्यता निर्माण झाली असून, राजकीय स्तरावरही त्याचे पडसाद उमटत आहेत.

शेतकऱ्यांसाठी मदतकार्य सुरू असताना वक्तव्यामुळे पक्षाची अडचण

दरम्यान, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी कुटुंबांतील महिलांना २५ हजार शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकली देण्याचा उपक्रमही सुरू आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दुष्काळग्रस्त भागांसाठी १०० ट्रक अन्नधान्य पाठवण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी आणखी २४ ट्रक धान्य पाठवण्यात आल्याची माहिती आहे.एका बाजूला पक्षाकडून शेतकऱ्यांसाठी मदतकार्य सुरू असताना दुसऱ्या बाजूला आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना पक्षातील काही नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे नाराज; कारवाईबाबत चर्चांना उधाण

शेतकरी हा अन्नदाता असून त्यांच्याविरोधात बेजबाबदार वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.मात्र, या कारवाईबाबत अधिकृत घोषणा झाल्याची पुष्टी उपलब्ध नसल्याने निलंबनाचा निर्णय प्रत्यक्षात लागू झाला आहे का, हे स्पष्ट होणे बाकी आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडून या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेतली जाते आणि संजय गायकवाड यांच्यावर कोणती कारवाई होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या दोन काव्यसंग्रहांचा १ नोव्हेंबरला प्रकाशन सोहळा

Next Post

गावठी दारूच्या अड्ड्यांवर भुसावळ पोलिसांचा छापा; १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गावठी दारूच्या अड्ड्यांवर भुसावळ पोलिसांचा छापा; १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

गावठी दारूच्या अड्ड्यांवर भुसावळ पोलिसांचा छापा; १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक गायब! ५ प्रवासी अन् पायलटचा शोध सुरू

मोठी बातमी! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक गायब! ५ प्रवासी अन् पायलटचा शोध सुरू

October 30, 2026
HSRP नंबर प्लेटच्या कामात दिरंगाई; महाराष्ट्रातील २७ आरटीओ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

HSRP नंबर प्लेटच्या कामात दिरंगाई; महाराष्ट्रातील २७ आरटीओ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

October 30, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या

October 30, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेच्या १८ ट्रेनचा सुपरफास्ट दर्जा रद्द होणार; तिकीटदर कमी होण्याची शक्यता

October 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page