जळगाव : ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ या मराठी काव्यसंग्रहासह ‘तुकबंदी’ या हिंदी-उर्दू काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
‘कवितेच्या वळणवाटा’ या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी प्रा. वा. ना. आंधळे यांच्या हस्ते, तर ‘तुकबंदी’ या हिंदी-उर्दू काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव डॉ. रफिक काझी ‘राही’ यांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्यास जळगांव येथील मु. जे. महाविद्यालयातील प्रा. देवेंद्र इंगळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर अथर्व प्रकाशनचे संचालक युवराज माळी हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वैद्य पी. एस. चौधरी, डॉ. विलास जे. महाजन तसेच भटकर, वानखेडे व पोद्दार परिवारातर्फे करण्यात आले आहे.















Discussion about this post