तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँकेत सिविल आणि इंजिनियरिंग ब्रँचमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी opportunities.rbi.org.in वर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या नोकरीसाठी ६ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. याच कालावधीत तुम्हाला परीक्षेसाठी फी भरायची आहे. या नोकरीसाठीची परीक्षा ६ जून २०२६ रोजी होणार आहे.
पात्रता काय?
ज्युनिअर इंजिनियर पदासाठी तुम्ही इंजिनियरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा. सिविल इंजिनियरिंग पूर्ण केलेल्या तरुणांसाठीही ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे २ वर्षांचा अनुभव असायला हवा.डिग्री असणाऱ्या उमेदवारांकडे १ वर्षाचा कामाचा अनुभव असायला हवा.
ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रिक पदासाठी उमेदवारांना इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. डिप्लोमाधारकांकडे २ वर्षांचा अनुभव असायला हवा.डिग्री केलेल्या उमेदवारांकडे १ वर्षाचा अनुभव असायला हवा.
रिझर्व्ह बँकेत एकूण ११ पदांसाठी भरती केली जाणार आहे. २०-३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला महिन्याला बेसिक सॅलरी ४७,७०० रुपये मिळणार आहे. याचसोबत इतर अनेक भत्ते मिळणार आहे. एकूण तुम्हाला ९१,३०९ रुपये मिळणार आहे.
रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्टद्वारे होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारी करायची आहे.















Discussion about this post