राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले असून पुढील पाच दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. जळगावसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यासाठी १ जुलै रोजी ‘रेड अलर्ट’ (अतिवृष्टीचा इशारा) घोषित करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ जुलै रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, सातारा घाट, कोल्हापूर घाट, पुणे घाट, मुंबई शहर, मुंबई उपनगर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी मात्र अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे रेड अलर्ट देण्यात आला आहे.
२ जुलैचा अंदाज
२ जुलै रोजी पालघर आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, कोल्हापूर घाट आणि सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशीम, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
३ जुलैलाही पावसाचा जोर कायम
३ जुलै रोजी जळगावसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट राहणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला, अमरावती, कोल्हापूर घाट आणि सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून रायगड आणि पुणे घाट परिसरात अधिक तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
४ आणि ५ जुलैलाही पावसाचा इशारा
४ आणि ५ जुलै रोजीही राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच वादळी वाऱ्याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.















Discussion about this post