Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विद्यार्थी संख्या घटली; तरी विद्यापीठात नव्या वसतिगृहाचा घाट

विद्यापीठाच्या निधीतून होणाऱ्या बांधकामावर प्रश्नचिन्ह

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 2, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय!
बातमी शेअर करा..!

जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असताना मुलांचे वसतिगृह क्रमांक ४ उभारण्याचा घाट घातला जात असल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या प्राधान्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हे वसतिगृह विद्यापीठाच्या निधीतून बांधले जात असून, विद्यार्थी संख्या कमी होत असताना अशा बांधकामाची गरज काय? असा सवाल शैक्षणिक वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच मुलांचे वसतिगृह क्रमांक ४ तसेच काही अन्य इमारतींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने नवीन सुविधा उभारणे स्वागतार्ह असले तरी सध्याची विद्यार्थी संख्या, उपलब्ध वसतिगृहांची क्षमता आणि विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती पाहता नव्या वसतिगृहाला प्राधान्य देण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

विद्यापीठात सध्या मुलांसाठी तीन वसतिगृहे कार्यरत आहेत. याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून विद्यापीठाजवळ स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. दुसरीकडे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील प्रवेशसंख्येत मोठी घट झाली आहे. विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना तसेच उपलब्ध विद्यार्थ्यांसाठी आधीच कमी असलेल्या सुविधांचा विस्तार करण्यापेक्षा आणखी एक वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या नियोजनक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना नव्या वसतिगृहाची गरज नेमकी कशासाठी, असा सवाल ही आता उपस्थित होत आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे, शासनाने २०२४ मध्ये “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सेंटर ऑफ एक्सलन्स इन जर्नालिझम” साठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसा शासन निर्णयही मार्च 2024 मध्ये काढण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थी वसतिगृहासाठी सात कोटी रुपयांची तरतूद असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे. हा निधी विद्यापीठाला प्राप्त झाला असता तर त्यातून विद्यार्थी वसतिगृहाचे काम करता आले असते. परिणामी विद्यापीठाच्या निधीतून, म्हणजेच विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुल्कातून वसतिगृह उभारण्याची गरज भासली नसती. मात्र हा मंजूर निधी दोन – सव्वा दोन वर्षात अद्याप विद्यापीठाला मिळालेला नसल्याने हा निधी मिळविण्यासाठी कुलगुरू माहेश्वरीं व विद्यापीठ प्रशासनाने नेमके काय प्रयत्न केले ? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

शासनाकडून विद्यापीठास कोणतेही अनुदान आता मिळत नाही. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क तसेच महाविद्यालयांकडून प्राप्त होणाऱ्या विविध शुल्कांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असताना विद्यापीठाच्या निधीतून मोठ्या बांधकामांना प्राधान्य देण्याची गरज काय? अशी प्रतिक्रिया शैक्षणिक क्षेत्रात उमटत आहे. इमारती बांधण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या शुल्कातून जमा झालेला पैसा हा आहे त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा, संशोधन, प्रयोगशाळा, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि अन्य मूलभूत गरजांसाठी अधिक प्रभावीपणे वापरला जाणे अपेक्षित असल्याचेही जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या कार्यकाळाचा अखेरचा टप्पा जवळ येत असताना विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटने आणि कोनशिला लावण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कार्यकाळ संपण्यापूर्वी आपल्या आपल्या नावाच्या कोनशिला विद्यापीठ परिसरात लावण्याची घाई तर केली जात नाही ना ?असा सवाल उपस्थित होत आहे. कुलगुरू माहेश्वरी यांच्या आधीच्या दोन कुलगुरूंनीही आपल्या कार्यकाळाच्या अखेरीस अशाच पद्धतीने विविध कामांच्या कोनशिला लावून घेवून आपल्या नावाची आठवण विद्यापीठ परिसरात ठेवण्याचा प्रयत्न केल्याची विद्यापीठ परिसरात चर्चा आहे.

विद्यापीठात सध्या सर्वात मोठे आव्हान विद्यार्थी संख्या वाढविण्याचे आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे अभ्यासक्रम, रोजगाराभिमुख शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाच्या संधी आणि उद्योगांशी प्रभावी समन्वय यावर भर देण्याची गरज असताना इमारती उभारण्यालाच विकासाचे मापदंड मानले जात असतील तर त्याचा विद्यापीठाला किती फायदा होणार ? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

विद्यार्थी संख्या कमी होत असताना वसतिगृहे वाढविणे आणि दुसरीकडे शासनाकडून मंजूर झालेला निधी मिळविण्यात अपयश येणे, या दोन्ही बाबी एकाच वेळी समोर आल्याने कुलगुरू माहेश्वरी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शैक्षणिक वर्तुळात याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विद्यापीठाला खरोखर गरज आहे ती नव्या इमारतींची की विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा ठरत आहे. केवळ भूमिपूजन आणि कोनशिला यामुळे विद्यापीठाचा विकास होत नाही; त्या बांधकामामागे ठोस गरज, आर्थिक शिस्त,नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे नियोजन असणे आवश्यक आहे. त्यामुळे वसतिगृहाच्या बांधकामाचा निर्णय आणि त्यासाठी विद्यापीठाच्या निधीचा वापर याबाबत कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनाने आपली स्पष्ट भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शैक्षणिक क्षेत्रात होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! महिनाभराच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाची शक्यता

Next Post

जळगावात तृतीयपंथीयांसाठी ३ सप्टेंबरला शासकीय योजनांचे विशेष शिबिर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात तृतीयपंथीयांसाठी ३ सप्टेंबरला शासकीय योजनांचे विशेष शिबिर

जळगावात तृतीयपंथीयांसाठी ३ सप्टेंबरला शासकीय योजनांचे विशेष शिबिर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026
आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

October 17, 2026
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

October 17, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हात आखडता; सरकारचा व्हीआयपी गाड्यांसाठी १२ कोटींची खैरात

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page