जळगाव । जळगाव जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणीकृत तृतीयपंथीय व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे एकदिवसीय शिबिर सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवी मंदिरासमोर, जळगाव येथे होणार आहे.
या शिबिरात तृतीयपंथीय व्यक्तींना मतदान कार्ड, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड, आभा कार्ड, आयुष्मान भारत कार्ड यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांची आवश्यक कार्यवाही करून संबंधित योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.
शिबिरासाठी विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, उपलब्ध सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांकडून सहकार्य केले जाणार आहे.
जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणीकृत सर्व तृतीयपंथीय व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील यांनी केले आहे.















Discussion about this post