Friday, September 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोहाडीतील तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलले; आत्महत्या नव्हे, कुटुंबीयांकडूनच हत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 4, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव : मोहाडी येथे गेल्या महिन्यात झालेल्या २६ वर्षीय तरुणाच्या मृत्यूला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला आत्महत्या असल्याचे समोर आलेल्या या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून तरुणाचा गळफास देऊन खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, या हत्येच्या आरोपाखाली मयताच्या आई-वडिलांसह भावाला अटक करण्यात आली आहे.

एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहाडी येथे ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास राधेशाम हरचंद राठोड (वय २६) याचा मृतदेह आढळून आला होता. राधेशामने दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यावेळी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

मात्र, तपासादरम्यान पोलिसांना या घटनेबाबत काही बाबी संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी कुटुंबीयांकडे चौकशी सुरू करून घटनाक्रमाची बारकाईने पडताळणी केली. चौकशी आणि तपासातून समोर आलेल्या माहितीने या प्रकरणाचे चित्रच पालटले.

घरातील सततच्या वादातून टोकाचे पाऊल

पोलिसांच्या तपासानुसार, राधेशामला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो घरी आल्यानंतर आई-वडील आणि भावासोबत वाद घालत तसेच त्यांना मारहाण करत असल्याचे समोर आले. त्याच्या या वागणुकीमुळे कुटुंबीय त्रस्त झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

याच त्रासातून राधेशामला कायमचे संपवण्याचा निर्णय आरोपींनी घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानुसार तिघांनी संगनमत करून त्याचा काटा काढण्याचे ठरवले.

हत्येनंतर आत्महत्येचा बनाव

३१ जुलै रोजी आरोपींनी राधेशामला दोरीच्या सहाय्याने गळफास देऊन त्याचा जीव घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्यात आले. हत्येसाठी वापरण्यात आलेली दोरीही आरोपींनी जाळून टाकल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर राधेशामने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासवण्यात आले.सुरुवातीला आत्महत्या मानून अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. अखेर चौकशीत समोर आलेल्या बाबींमधून आत्महत्येचा बनाव उघडकीस आला आणि प्रकरणाला हत्येचे स्वरूप असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मयताची आई मीराबाई हरसिंग राठोड, वडील हरसिंग उर्फ हरचंद नथ्यु राठोड आणि भाऊ सचिन हरसिंग राठोड या तिघांना अटक केली आहे. तिन्ही आरोपी मोहाडी येथील रहिवासी आहेत.या घटनेमुळे मोहाडी परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्या म्हणून समोर आलेल्या घटनेमागे कुटुंबातीलच सदस्यांचा सहभाग असल्याचे उघड झाल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

घसरणीला ब्रेक! जळगावच्या सुवर्णनगरीत सोने 1,700 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी महागली

Next Post

डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवला अन् थेट हल्ला; विद्यानंद बापट प्रकरणावर शरद पवार संतापले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवला अन् थेट हल्ला; विद्यानंद बापट प्रकरणावर शरद पवार संतापले

डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवला अन् थेट हल्ला; विद्यानंद बापट प्रकरणावर शरद पवार संतापले

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ठिबक व तुषार सिंचन संचाच्या कार्यक्षम वापराबद्दल हिवरखेडा बु. ग्रामपंचायतीचा दिल्लीत गौरव

भागपूर उपसा सिंचन योजनेला वेग ! जामनेर-पाचोरा तालुक्यातील १,३९५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार!

September 4, 2026
भुसावळात तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त; दोन जिवंत काडतुसांसह ३२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

भुसावळात तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त; दोन जिवंत काडतुसांसह ३२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर कुस्तीपटू आईने तीन मुलांसह घेतली उडी; तपासात धक्कादायक बाबी समोर

नळदुर्ग किल्ल्यावर कुस्तीपटू आईने तीन मुलांसह घेतली उडी; तपासात धक्कादायक बाबी समोर

September 4, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘ऑपरेशन टायगर’चा दणका; शरद पवार गटाच्या दोन माजी नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक शिंदेसेनेत

जळगाव जिल्ह्यात ‘ऑपरेशन टायगर’चा दणका; शरद पवार गटाच्या दोन माजी नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक शिंदेसेनेत

September 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page