पारोळा : पारोळा शहरातील महामार्गावर तलाठी कॉलनीजवळ पिकअप गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवे (ता. पारोळा) येथील विशाल संजय पाटील (वय २६) हा कामानिमित्त दुचाकीने पारोळा येथे येत होता. त्यांची दुचाकी (क्रमांक एमएच १९, डीसी ६९६८) शहरातील महामार्गावरील तलाठी कॉलनीजवळ आली असता, पारोळ्याकडून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप गाडीने (क्रमांक एमएच ४७, एबी ५९३२) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात विशाल पाटीलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने म्हसवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात घडल्यानंतर पिकअप गाडीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी चिंतामण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास साळुंखे करीत आहेत.















Discussion about this post