Friday, September 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवला अन् थेट हल्ला; विद्यानंद बापट प्रकरणावर शरद पवार संतापले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 4, 2026
in जळगाव जिल्हा
0
डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवला अन् थेट हल्ला; विद्यानंद बापट प्रकरणावर शरद पवार संतापले
बातमी शेअर करा..!

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवातील डीजेच्या वाढत्या दणदणाटाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर भर कार्यक्रमात हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

बापट हे पुण्यातील सण-उत्सवांमध्ये वाढत चाललेल्या कर्णकर्कश डीजेच्या आवाजाला विरोध करत आहेत. नागरिकांना होणारा त्रास आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा ते सातत्याने उपस्थित करत आहेत. मात्र, त्यांच्या या भूमिकेलाच विरोध करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याने मतभेद मांडण्याच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत हल्लेखोरांवर निशाणा साधला. विद्यानंद बापट यांना आपण वैयक्तिकरित्या ओळखत नसल्याचे सांगत, त्यांनी मांडलेल्या भूमिकेत तथ्य असल्याचे पवार म्हणाले. सण आणि उत्सव हे लोकांना आनंद देणारे असले पाहिजेत. मात्र, डीजेच्या मोठ्या आवाजामुळे सणाचे गांभीर्य कमी होते. एखाद्या व्यक्तीने एखाद्या विषयावर मत मांडले म्हणून त्याच्यावर हल्ला करणे म्हणजे लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

तसेच या घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त आणि राज्य सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेकांनी या घटनेचा निषेध केला असून, आपण त्यांच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.दरम्यान, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनीही पुण्यातील वाढत्या आक्रमक प्रवृत्तींवर चिंता व्यक्त केली. पुणे हे चांगुलपणाची प्रयोगशाळा म्हणून ओळखले जात होते. मात्र, काही प्रवृत्तींमुळे शहराची ओळख बदलत असून, काही कट्टरवादी प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र दिसत असल्याची टीका त्यांनी केली.

हल्ल्यानंतर आरोपीचा व्हिडिओ चर्चेत

या प्रकरणातील हल्लेखोराचे नाव संतोष चव्हाण असल्याचे समोर आले आहे. तो पुण्यातील एका गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती आहे. बापट यांच्यावर हल्ला केल्यानंतर चव्हाण घटनास्थळावरून निघून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली.हल्ल्यानंतर संतोष चव्हाणचा एक व्हिडिओ समोर आला आहे. गणेशोत्सवावर बंधने आणली तर अनेकांच्या घरातील चूल पेटणार नाही, असा दावा तो या व्हिडिओमध्ये करताना दिसत आहे.बापट यांच्यावर हल्ला करतानाही चव्हाण आक्रमक भाषेत बोलत असल्याचे व्हिडिओत दिसून येते. “तुला कोणी ऑब्जेक्शन घ्यायला सांगितलंय? मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या…” असे म्हणत त्याने बापट यांच्याशी वाद घातल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर पुण्यातील डीजे संस्कृती, ध्वनिप्रदूषण, गणेशोत्सवातील ध्वनिमर्यादा आणि विरोधी मत सहन करण्याची मानसिकता यावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एखाद्या भूमिकेला विरोध करण्यासाठी चर्चा आणि कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना थेट हल्ल्याचा मार्ग स्वीकारला जाणे गंभीर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोहाडीतील तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलले; आत्महत्या नव्हे, कुटुंबीयांकडूनच हत्या

Next Post

Chalisagaon : बिलाखेड अपघात प्रकरणात भाजप सरचिटणीसावर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

Chalisagaon : बिलाखेड अपघात प्रकरणात भाजप सरचिटणीसावर गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ठिबक व तुषार सिंचन संचाच्या कार्यक्षम वापराबद्दल हिवरखेडा बु. ग्रामपंचायतीचा दिल्लीत गौरव

भागपूर उपसा सिंचन योजनेला वेग ! जामनेर-पाचोरा तालुक्यातील १,३९५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार!

September 4, 2026
भुसावळात तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त; दोन जिवंत काडतुसांसह ३२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

भुसावळात तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त; दोन जिवंत काडतुसांसह ३२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर कुस्तीपटू आईने तीन मुलांसह घेतली उडी; तपासात धक्कादायक बाबी समोर

नळदुर्ग किल्ल्यावर कुस्तीपटू आईने तीन मुलांसह घेतली उडी; तपासात धक्कादायक बाबी समोर

September 4, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘ऑपरेशन टायगर’चा दणका; शरद पवार गटाच्या दोन माजी नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक शिंदेसेनेत

जळगाव जिल्ह्यात ‘ऑपरेशन टायगर’चा दणका; शरद पवार गटाच्या दोन माजी नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक शिंदेसेनेत

September 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page