बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (MSC Bank) भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत विशेष शाखा व्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक अशा एकूण ३६ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांना २२ जून २०२६ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भरतीचा तपशील
विशेष शाखा व्यवस्थापक (अधिकारी श्रेणी-२) – ३० पदे
शाखा व्यवस्थापक – ६ पदे
भरतीसाठी पात्रता काय?
विशेष शाखा व्यवस्थापक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी, संबंधित क्षेत्रातील किमान ५ वर्षांचा अनुभव
शाखा व्यवस्थापक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी व संबंधित क्षेत्रातील १० ते १२ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा
१ मे २०२६ रोजीच्या स्थितीनुसार –
विशेष शाखा व्यवस्थापक: किमान ४५ वर्षे
शाखा व्यवस्थापक: ४५ ते ६२ वर्षे
नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रातील शाखांमध्ये केली जाणार आहे.
अर्ज शुल्क नाही
या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही, ही उमेदवारांसाठी दिलासादायक बाब आहे.
अर्ज ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर पाठवावा –
The Deputy General Manager (OSD),
HRD&M Department,
The Maharashtra State Co-operative Bank Ltd.,
Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan,
9, Maharashtra Chamber of Commerce Lane,
Fort, Mumbai – 400001.
महत्त्वाची तारीख
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख : २२ जून २०२६
अनुभवी बँकिंग व्यावसायिकांसाठी ही उत्तम संधी असून पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post