Tuesday, July 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात भाजपला खिंडार! अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 6, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
जळगावात भाजपला खिंडार! अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड समोर आली आहे. भारतीय जनता पक्षातील (BJP) अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. पाचोऱ्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विशेष पुढाकारातून झालेल्या या पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवीन कलाटणी मिळाली असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील महायुती सरकारमध्ये शिवसेनेची वाढती ताकद आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमान नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश?
शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामध्ये भुषण भोळे, राहुल पाटील, प्रशांत कोळी, विशाल महाजन, महेश पाटील, मुकेश पाटील, गणेश बच्छाव, प्रशांत चौधरी, राझिक पटेल, ओम बारी, रंजन पाटील, चेतन चौधरी, अक्षय भडांगे, सुयोग गुजर, विकास ठाकरे, जयेश पाटील, सागर पाटील, लोकेश पाटील, भावेश पाटील, दीपक कोळी आणि तौफिक खान यांचा समावेश आहे.

संघटन बळकटीसाठी एकत्रित कामाचे आवाहन
या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित वरिष्ठ नेत्यांनी सर्व नव्या सदस्यांचे भगवा गळाबंद घालून पक्षात स्वागत केले. शिवसेनेची विचारधारा, विकासाभिमुख भूमिका आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर थेट काम करण्याची कार्यपद्धती यामुळेच अनेक तरुण आणि अनुभवी कार्यकर्ते शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेणारे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दाखल झालेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “जिल्ह्यात पक्षवाढीसाठी आणि संघटन बळकटीसाठी आपण सर्वजण आता एकत्रितपणे काम करू. आगामी काळात जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढविण्यासाठी आणि शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते मैलाचा दगड ठरतील.”

राजकीय निरीक्षकांचे लक्ष
महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपमधून थेट शिवसेनेत (शिंदे गट) एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जात असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वेगवेगळ्या पक्षांतील कार्यकर्त्यांचे शिवसेनेकडे वाढते आकर्षण आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक विस्तारासाठी सुरू असलेल्या या हालचालींकडे आता राजकीय निरीक्षकांचे बारीक लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

वाहनधारकांचं टेन्शन वाढवणारी बातमी ! पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागणार?

Next Post

बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; २४ तासांत राज्यातील २५ जिल्ह्यांना अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; २४ तासांत राज्यातील २५ जिल्ह्यांना अलर्ट

बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; २४ तासांत राज्यातील २५ जिल्ह्यांना अलर्ट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कर्जबाजारीपणा आणि नैराश्यातून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; अमळनेर तालुक्यातील घटना

कर्जबाजारीपणा आणि नैराश्यातून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; अमळनेर तालुक्यातील घटना

July 28, 2026
पुढील ४८ तास धोक्याचे! १०० किमी वेगाने वादळ घोंगावणार; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; वाचा हवामान अंदाज

July 28, 2026
शालार्थ घोटाळ्यात ‘बडा मासा’ गळाला! जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीचे भाजप नेते संजय गरुड यांना ठोकल्या बेड्या

शालार्थ घोटाळ्यात ‘बडा मासा’ गळाला! जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीचे भाजप नेते संजय गरुड यांना ठोकल्या बेड्या

July 28, 2026
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..

भाजपच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला, मोठी खळबळ

July 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page