Sunday, October 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मॉन्सूनचा निरोप; आता राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 4, 2026
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?
बातमी शेअर करा..!

राज्यात यंदा मॉन्सूनच्या लहरीपणामुळे पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने काहीसा दिलासा दिला. मात्र आता राज्यासह देशातील अनेक भागांतून मॉन्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली असून, वातावरणात उष्णता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यातच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास वेगाने सुरू केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, देशाच्या मोठ्या भागातून मॉन्सून माघारी फिरला असून उत्तर भारतातील अनेक राज्यांसह महाराष्ट्राच्या जवळपास निम्म्या भागातूनही मॉन्सूनने परतीचा मार्ग धरला आहे.

महाराष्ट्रातूनही मॉन्सूनची माघार

यंदा १९ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीला सुरुवात झाली. त्यानंतर २३ सप्टेंबरपर्यंत देशाच्या वायव्य भागातील बहुतांश परिसरातून मॉन्सूनने माघार घेतली. आता परतीचा वेग वाढला असून गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगडसह महाराष्ट्रातील काही भागांतूनही मॉन्सून परतला आहे.

सध्या मॉन्सूनच्या परतीची सीमा सुपौल, रांची, रायपूर, ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हर्णे या भागांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाळ्याचा अंतिम टप्पा सुरू झाल्याचे चित्र आहे.

कोरडे वारे; तापमानात वाढ

मॉन्सूनच्या माघारीसाठी आवश्यक हवामान परिस्थिती निर्माण झाल्याने कोरडे उत्तरेकडील वारे वाहू लागले आहेत. परिणामी वातावरणातील आर्द्रता कमी होत असून तापमानात वाढ जाणवत आहे. त्यामुळे दिवसभर उकाडा वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत.

हवामान विभागाने यापूर्वी राज्यातील काही भागांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला होता. आजही उकाडा कायम राहण्याची शक्यता असून, संध्याकाळनंतर वातावरणात काहीसा थंडावा निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुढील काही दिवसांत मॉन्सून आणखी माघारी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांतून मॉन्सून आणखी माघारी जाण्याची शक्यता आहे. तसेच छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकातील काही भागांतूनही मॉन्सून परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मॉन्सूनच्या माघारीनंतर राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता असून नागरिकांना आता ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागू शकतो. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढल्या; २० वर्षे जुन्या प्रकरणाची पुन्हा चौकशी, राज्य सरकारचे आदेश

Next Post

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनची रेकी; खडसेंची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनची रेकी; खडसेंची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनची रेकी; खडसेंची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महसूल मंत्री बावनकुळेंचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; शेतात पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

महसूल मंत्री बावनकुळेंचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; शेतात पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

October 4, 2026
ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी! ECIL मध्ये ३१० अप्रेंटिस पदांची भरती

ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी! ECIL मध्ये ३१० अप्रेंटिस पदांची भरती

October 4, 2026
एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनची रेकी; खडसेंची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनची रेकी; खडसेंची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 4, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

मॉन्सूनचा निरोप; आता राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार

October 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page