Monday, September 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

..तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडणार! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 7, 2026
in महाराष्ट्र
0
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा
बातमी शेअर करा..!

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी उपचार आणि पाणी घेण्यासही नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. अशा परिस्थितीतही जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम असून, सरकारकडून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सरकारने वेळीच मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला असता, तर आंदोलनाची वेळ आलीच नसती, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. २९ जून रोजीच सरकारला आंदोलनाची परिस्थिती निर्माण होऊ नये, असा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याचा दावा त्यांनी केला.

आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून होत असलेल्या विलंबामागे मराठा समाजाबाबतचा आकस असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला. सरकारच्या भूमिकेमुळे समाजामध्ये असंतोष वाढत असून, परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, मराठा आंदोलन दडपण्यासाठी पडद्यामागे प्रयत्न सुरू असल्याचाही दावा जरांगे पाटील यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. छत्रपती संभाजीनगर येथे सत्ताधारी मंत्र्यांची बैठक झाल्याचा दावा करत, आंदोलन रोखण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटले. मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी काही जणांकडून ते हिंसक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मुंबईच्या दिशेने जाताना पोलिसांकडून अडथळे निर्माण झाले, तरी आंदोलकांनी पोलिसांशी संघर्ष करू नये आणि कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबईकडे जाताना पोलिसांकडून अडथळे निर्माण झाले तरी आंदोलकांनी संयम राखावा आणि कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाचा आवाज बंद करणे हा सत्ताधाऱ्यांचा छुपा अजेंडा आहे. जर मुंबईला जाताना आपल्या बांधवांना अडवलं किंवा त्यांना मारहाण झाली तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद पाडा.

फडणवीसांवरही जरांगेंची टीका
देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर टीका करताना जरांगे पाटील यांनी आंदोलन दडपण्याचा विचार सत्ताधाऱ्यांच्या मनात असल्याचा दावा केला. विरोधकांवर तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय होत असेल तर सरकारला जाब विचारणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची मोठी संधी; 175 जागांसाठी भरती, पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा

..तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडणार! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

September 7, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची मोठी संधी; 175 जागांसाठी भरती, पात्रता काय?

September 7, 2026
MPSCच्या कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; हजारो विद्यार्थी रस्त्यावर

MPSCच्या कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; हजारो विद्यार्थी रस्त्यावर

September 7, 2026
मंत्री गिरीश महाजनांसमोरच पदाधिकाऱ्याने रक्षा खडसेंना खडेबोल सुनावले

रक्षा खडसे बैठकीतून बाहेर पडल्या..; जळगावात भाजपमध्ये अंतर्गत वादाची चर्चा, गिरीश महाजन म्हणाले..

September 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page