Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महिला बचत गट चळवळ आता मोठी, जळगाव जिल्ह्यात 1 लाख लखपती दीदी करण्याचा मनोदय; जलसंपदा मंत्री महाजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
महिला बचत गट चळवळ आता मोठी, जळगाव जिल्ह्यात 1 लाख लखपती दीदी करण्याचा मनोदय; जलसंपदा मंत्री महाजन
बातमी शेअर करा..!

उमेद आयोजित सरस -2025 चे उदघाटन; 27 जानेवारी पर्यंत असणार सुरु

जळगाव | महिला बचत गट चळवळ अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील महिलांना येण्यास अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून राज्यात विविध विभागांत ‘मिनी सरस प्रदर्शन’ सुरू करण्यात आले. यामुळे बचत गटाच्या उलाढालीत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत होत असलेल्या प्रदर्शनात 10 कोटींची उलाढाल होत असे, परंतु विभागीय प्रदर्शनांमुळे ही उलाढाल 22 कोटींपर्यंत पोहोचली आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील उमेदच्या वतीने आयोजित मिनी सरस प्रदर्शन-2025 चे उद्घाटन त्यांच्या हस्ते जि. एस. ग्राऊंडवर झाले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बचत गट चळवळीला अधिक व्यापक करून 1 लाख लखपती दीदी तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

महिला बचत गट सशक्त होण्यासाठी मोठे पाऊल
राज्यात सुमारे 65 लाख महिला बचत गट कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या माध्यमातून राज्यातील महिला केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातही आपल्या वस्तू निर्यात करत आहेत. राष्ट्रीयकृत बँकाही बचत गटांना मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवत असून, त्याचे नियमित पुनर्भरण होत असल्याने बँकांचे एनपीए टाळले जात आहे. राज्यातील बँकांनी आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटांना वितरित केल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

मुक्ताई सरस प्रदर्शनाची यशस्वी परंपरा

महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वस्तूंचे आकर्षक पॅकिंग व विपणन गरजेचे आहे. याची जाणीव ठेवून 2010 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना मुक्ताई सरस प्रदर्शनाची सुरुवात केल्याचा आनंद खा. स्मिता वाघ यांनी व्यक्त केला. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून माऊथ पब्लिसिटी महत्त्वाची ठरते, असेही त्यांनी नमूद केले.

जळगावकरांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन

प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी 23 ते 27 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनाला जळगावकरांनी मोठ्या संख्येने भेट देऊन महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लावावा, असे आवाहन केले.

खाद्य पदार्थांचा आस्वाद व महिलांच्या आनंददायक प्रतिक्रिया

प्रदर्शनामध्ये मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ यांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन खरेदी केली व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. जिल्हाधिकारी प्रसाद यांनाही आग्रहाने सहभागी करून घेतल्याने स्टॉल धारक महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लालपरीचा प्रवास झाला महाग; तिकीट दरवाढ आजपासून लागू

Next Post

२७ पासून विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२७ पासून विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिर

२७ पासून विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

केंद्र सरकारच्या संस्थेत भरती, या पदांसाठी अर्ज करा; पगार लाखांमध्ये

July 8, 2026
जळगाव शहराची पाणी टंचाई मिटली ; वाघूर धरण ८२ टक्के भरले

आनंदाची बातमी! गिरणा धरणात २४ तासांत मोठी वाढ

July 8, 2026
.. मग् मोदी-शाह आणि फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील ; संजय राऊत नेमकं काय म्हणाले

अफवा पसरवणे ही भाजपचीच चाल ; शरद पवार अन् अजित पवार गटाच्या विलीनीकरणावर राऊत कडाडले

July 8, 2026
एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page