पुणे । बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. mahahsscboard.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. राज्य मंडळाने याबाबतची अधिकृत घोषणा केली. शनिवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या संदर्भात राज्य मंडळाकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, निकाल जाहीर होण्यापूर्वी त्याच दिवशी सकाळी ११ वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत निकालासंबंधी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी ही माहिती दिली असून, माध्यम प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.















Discussion about this post