Friday, October 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नशिराबाद नजीक राखेचा डंपर अन् ट्रकमध्ये समोरासमोर धडक, चालक जागीच ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 30, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
नशिराबाद नजीक राखेचा डंपर अन् ट्रकमध्ये समोरासमोर धडक, चालक जागीच ठार
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून अशातच जळगाव–भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर नशिराबादजवळ गुरुवारी रात्री भीषण अपघाताची घटना समोर आलीय. मकरा फटाक्यांसमोर सोयाबीन वाहून नेणारा ट्रक आणि राखेच्या डंपरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत ट्रकचालक रमेश चंद्र यादव (वय ५६, रा. उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला, तर डंपरचालक मुक्तचर अली (रा. मध्य प्रदेश) गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या यादव यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल एक तास प्रयत्न करावे लागले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून नागपूरच्या दिशेने सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक (एमएच ४० बीजी ६२८७) रमेश चंद्र यादव चालवत होते. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास नशिराबादजवळील मकरा फटाक्यांसमोर हा ट्रक आला असता, दीपनगर येथून जळगावच्या दिशेने राख घेऊन जाणाऱ्या डंपरशी (एमएच १५ जीडब्ल्यू ३८७९) त्याची जोरदार धडक झाली.दोन्ही वाहनांची धडक इतकी भीषण होती की, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या धडकेत ट्रकचालक यादव केबिनमध्येच अडकून पडले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

स्थानिक नागरिकांनी धाव घेत सुरू केले मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक सतीश बेलसरे, त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, ट्रकच्या केबिनमध्ये चालक अडकल्याने बचावकार्यात अडथळे येत होते.

अखेर क्रेनच्या साहाय्याने ट्रक हलवून तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर रमेश यादव यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. बचावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही.

डंपरचालकाच्या पायाला गंभीर दुखापत

या अपघातात डंपरचालक मुक्तचर अली यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. दोन्ही वाहनांचे नुकसान आणि बचावकार्य यामुळे सुमारे तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोदींच्याच वाराणसीत भाजपला धक्का! शिक्षक मतदारसंघात समाजवादी पार्टीचा दणदणीत विजय

Next Post

ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या दोन काव्यसंग्रहांचा १ नोव्हेंबरला प्रकाशन सोहळा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या दोन काव्यसंग्रहांचा १ नोव्हेंबरला प्रकाशन सोहळा

ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या दोन काव्यसंग्रहांचा १ नोव्हेंबरला प्रकाशन सोहळा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक गायब! ५ प्रवासी अन् पायलटचा शोध सुरू

मोठी बातमी! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक गायब! ५ प्रवासी अन् पायलटचा शोध सुरू

October 30, 2026
HSRP नंबर प्लेटच्या कामात दिरंगाई; महाराष्ट्रातील २७ आरटीओ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

HSRP नंबर प्लेटच्या कामात दिरंगाई; महाराष्ट्रातील २७ आरटीओ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

October 30, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या

October 30, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेच्या १८ ट्रेनचा सुपरफास्ट दर्जा रद्द होणार; तिकीटदर कमी होण्याची शक्यता

October 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page