नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी आहे. खादी व ग्रामोद्योग महामंडळात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत अॅडव्हायझर, सिनियर कन्सल्टंट्स आणि यंग प्रोफेशनल्स या तीन पदांसाठी एकूण ५० जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

भरतीमध्ये अॅडव्हायझर पदाच्या १५ जागा, सिनियर कन्सल्टंट्स पदाच्या १५ जागा, तर यंग प्रोफेशनल्स पदाच्या २० जागा आहेत. नोकरीचे ठिकाण मुंबई राहणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
अॅडव्हायझर: शासकीय विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातून निवृत्त झालेले किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी या पदासाठी पात्र असतील. संबंधित क्षेत्रातील किमान १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
सिनियर कन्सल्टंट्स: उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक असून संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
यंग प्रोफेशनल्स: या पदासाठी M.Com, MBA (Finance), CA, ICWA किंवा मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, ब्रँड मॅनेजमेंट, लॉ, मास कम्युनिकेशन, जर्नालिझम, मीडिया, PR, डिजिटल मीडिया, सिव्हिल, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेकॅनिकल किंवा केमिकल या विषयांतील पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार पात्र ठरू शकतात. संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती?
अॅडव्हायझर पदासाठी ३० सप्टेंबर २०२६ रोजी वय ४० ते ६५ वर्षे असणे आवश्यक आहे. सिनियर कन्सल्टंट्स पदासाठी याच तारखेला उमेदवाराचे वय ३९ वर्षांपेक्षा कमी असावे. तर यंग प्रोफेशनल्स पदासाठी १ ऑक्टोबर २०२६ रोजी वय २७ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करायचा?
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता आणि इतर अटी तपासून ३० सप्टेंबर २०२६ या अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासाठी कोणतेही शुल्क नमूद करण्यात आलेले नाही.














Discussion about this post