जळगाव । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे १९ ते २४ सप्टेंबर दरम्यान तब्बल १२ गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वे प्रशासाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी १९ सप्टेंबर रोजी भुसावळ विभागातील दोन गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. १९०४६ थावे–सुरत एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे, तर १२३३५ भागलपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास ३५ मिनिटे उशिराने चालविण्यात येईल.

एकूण १२ रेल्वे गाड्या रद्द
बुधवारी २३ सप्टेंबर रोजी काही गाड्या त्यांच्या मूळ स्थानकावरून रद्द राहणार आहेत. यामध्ये १९००७ सुरत-भुसावळ एक्स्प्रेस, १९१०५ उधना–भुसावळ एक्स्प्रेस आणि १९१०६ भुसावळ–उधना एक्स्प्रेसचा समावेश आहे. याशिवाय ११११४ भुसावळ–देवळाली मेमू आणि ६११३० बडनेरा–नाशिक रोड मेमू या गाड्याही २३ सप्टेंबर रोजी रद्द राहतील. याशिवाय गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी सात गाड्या त्यांच्या मूळ स्थानकावरून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १९००८ भुसावळ–सुरत एक्स्प्रेस, ५९०७५ नंदुरबार–भुसावळ पॅसेंजर आणि ५९०७६ भुसावळ–नंदुरबार पॅसेंजर यांचा त्यात समावेश आहे. तसेच ११११९ इगतपुरी–भुसावळ मेमू, १११२० भुसावळ–इगतपुरी मेमू, ११११३ देवळाली–भुसावळ मेमू आणि ६११२९ नाशिक–बडनेरा मेमू या गाड्यांचेही २४ सप्टेंबर रोजी संचालन होणार नाही.
गुरुवारी काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात येणार आहे. १२७८० हजरत निजामुद्दीन–वास्को द गामा एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे, १२१०४ लखनौ–पुणे एक्स्प्रेस १ तास ३५ मिनिटे आणि १५०१८ गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे उशिराने चालविण्यात येईल. याशिवाय १९०४६ थावे–सुरत एक्स्प्रेस १ तास ५ मिनिटे, तर १५६४८ गुवाहाटी–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास २५ मिनिटे नियमन करून चालविण्यात येणार आहे.















Discussion about this post