पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एका अत्यंत श्रीमंत कुटुंबातील शाही विवाह सोहळ्याची सध्या मोठी चर्चा होती. मात्र, लग्नाच्या आनंदावर विरजण घालणारी एक भयानक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध उद्योगपती विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून पडून झालेला मृत्यू हा अपघात नसून, तो एक सुनियोजित खून असल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे.
या प्रकरणात केतनची होणारी पत्नी आणि मार्केटयार्डमधील मसाला व्यापाऱ्याची मुलगी, सिया गोयल हिच्यावर हत्येचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. 14 कोटी खर्च करून कुटुंबियांनी आलिशान पद्धतीने लेक केतन अग्रवाल याचे लग्न करण्याचे ठरवले होते. केतन आणि सिया यांचे लग्न जयपूरमधील एका आलिशान पॅलेसमध्ये होणार होते. या भव्य सोहळ्यासाठी पाहुण्यांना नेण्यासाठी तब्बल 2 विमानेही बुक करण्यात आली होती. दोन्ही कुटुंबे मोठ्या उत्साहात लग्नाची तयारी करत असतानाच, या भीषण घटनेने सर्वांना धक्का दिला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सिया गोयल हिला केतनसोबत विवाह करण्याची अजिबात इच्छा नव्हती. घरच्यांच्या दबावामुळे तिने लग्नाला होकार दिला असला, तरी तिने केतनला कायमचे संपवण्याचा कट आखला होता. सियाने आपल्या एका मित्राच्या मदतीने केतनला लोहगड किल्ल्यावरून खोल दरीत ढकलून दिले आणि त्याचा अमानुष खून केला. या प्रकरणी सिया गोयलसह तिच्या आठ मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधी सर्वांना हा अपघाती मृत्यूच वाटत होता, पोलिसांनीही आकस्मिक मृत्यूची नोद केली होती. मात्र जसजसा या घटनेचा तपास पुढे सरकत गेला, तसतशा धक्कादायक गोष्टी समोर आल्या. पोलिसांचा संशय बळावला आणि सीसीटीव्हीमध्ये एक तरूण हुडी घालून संशयास्पद फिरता दिसल्यावर तर पोलिसांचा संशय आणखी वाढला.
अखेर त्यांनी सियाला चौकशी साठी बोलावलं, तिने प्रथन थातून मातूर उत्तर दिली, पण घटेच्या दिवशीच्या घटनाक्रमात, तिच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांनी तिला खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबूल केला. केतनशी लग्न करायचं नव्हतं, म्हणून मित्रासह मिळून त्याची हत्या केल्याचे तिने कबूल केल्याची माहिती समोर आली आहे. . त्यानंतर पोलिसांनी सिया आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतल्याचं समजतं.
या हायप्रोफाईल ‘मर्डर मिस्ट्री’मुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. लग्नाचे वातावरण अचानक शोकात बदलले असून, पोलीस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.















Discussion about this post