Tuesday, July 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 7, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!
बातमी शेअर करा..!

जळगाव । सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोटी गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे, शस्त्रांचे प्रदर्शन करून ‘भाईगिरी’ मिरवणारे आणि वाहतूक नियमांची ऐशीतैशी करून जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या ‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. महिलांचा अवमान करणाऱ्या आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या अशा आक्षेपार्ह रील्सची गंभीर दखल घेत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (७ जुलै) जिल्ह्यात ‘सायबर पॅट्रोलिंग’ची मोठी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत हुल्लडबाजांची धरपकड करून त्यांना थेट पोलीस मुख्यालयात आणत कायद्याचा कडक डोस देण्यात आला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचे व्हिडिओ युवकांवर विपरीत परिणाम करत असून गुन्हेगारी आणि नियमभंगाला प्रोत्साहन देतात. स्टंटबाजीमुळे अपघाताचा धोका वाढतो, तर महिलांचा अवमान करणारी सामग्री समाजात चुकीचा संदेश पोहोचवते. त्यामुळे अशा आशयाच्या रील्सवर लक्ष ठेवून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.पोलिसांच्या या धडक कारवाईचा उद्देश केवळ दंडात्मक कारवाई करणे एवढाच नव्हता, तर तरुणांमध्ये कायद्याबद्दल आदर निर्माण करणे आणि त्यांना गुन्हेगारीच्या दलदलीत जाण्यापासून परावृत्त करणे हा होता.

ही मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या पथकाने सायबर पॅट्रोलिंगद्वारे संबंधितांची ओळख पटवून त्यांना कायद्याची जाणीव करून दिली.

सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा, समाजविघातक किंवा कायद्याचे उल्लंघन करणारा मजकूर व व्हिडिओ प्रसारित करू नयेत, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जळगाव पोलिसांनी दिला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतीय रिझर्व्ह बँकेत परीक्षेविना नोकरीची संधी; पगार ₹4.10 लाखांपर्यंत

Next Post

पोलिसांकडून गंभीर चूक झालीच…; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पोलिसांकडून गंभीर चूक झालीच…; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली

पोलिसांकडून गंभीर चूक झालीच...; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार नियोजन अन् वेळेत कामांना प्राधान्य द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार नियोजन अन् वेळेत कामांना प्राधान्य द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

July 7, 2026
पोलिसांकडून गंभीर चूक झालीच…; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली

पोलिसांकडून गंभीर चूक झालीच…; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली

July 7, 2026
‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

July 7, 2026
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

भारतीय रिझर्व्ह बँकेत परीक्षेविना नोकरीची संधी; पगार ₹4.10 लाखांपर्यंत

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page