Tuesday, July 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पोलिसांकडून गंभीर चूक झालीच…; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 7, 2026
in जळगाव जिल्हा
0
पोलिसांकडून गंभीर चूक झालीच…; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली
बातमी शेअर करा..!

मुंबई | बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील मिसिंग प्रकरणात निर्दोष आदिवासी पिता-पुत्राला चुकीच्या पद्धतीने अटक करून अमानुष छळ करण्यात आल्याचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत चांगलाच गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे वर्तन “अतिशय लाजिरवाणे” असल्याचे मान्य करत दोषींवर फौजदारी कारवाई, विभागीय चौकशी आणि पात्र अधिकाऱ्यांना सेवेतून निष्कासित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी घोषणा केली.

चर्चेदरम्यान रोहित पवार यांनी या घटनेची तुलना ‘जय भीम’ चित्रपटाशी केली. चित्रपटात जसे खरे आरोपी सापडत नसल्याने गरीब आदिवासींना पकडून त्यांच्याकडून जबरदस्तीने गुन्ह्याची कबुली घेतली जाते, तसाच प्रकार महाराष्ट्रात घडल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार, जळगाव जामोद येथे एका महिलेचा जळालेला मृतदेह आढळल्यानंतर तपासात यश न आल्याने मध्य प्रदेशातील गरीब आदिवासी समाजातील एका निर्दोष पिता-पुत्राला ताब्यात घेण्यात आले. मृतदेह त्यांच्या मुलीचाच असल्याची कबुली देण्यासाठी त्यांचा कथितपणे अमानुष छळ करण्यात आला.

मात्र, ज्या महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता, ती महिला प्रत्यक्षात नाशिकमध्ये जिवंत असल्याचे समोर आले. ही घटना समजताच ती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली आणि संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. त्यामुळे निर्दोष पिता-पुत्रावरील कारवाई थांबली. अन्यथा त्यांना दीर्घ काळ तुरुंगवास किंवा गंभीर शिक्षेला सामोरे जावे लागले असते, असा दावा रोहित पवार यांनी केला.

सरकारने सभागृहात दिलेल्या लेखी उत्तरात केवळ जबाबाच्या आधारे अटक करण्यात आल्याचा उल्लेख असल्याबद्दल रोहित पवार यांनी तीव्र आक्षेप घेतला. संबंधित व्यक्तींना टॉर्चर करण्यात आल्याचे व्हिडिओ आणि नातेवाइकांचे आरोप सार्वजनिक झाले असून चुकीचे उत्तर सभागृहाच्या पटलावरून मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या प्रकरणात केवळ निलंबन पुरेसे नसून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, जेणेकरून पोलिस दलात चुकीच्या कारवाईविरोधात कठोर संदेश जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

Next Post

जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार नियोजन अन् वेळेत कामांना प्राधान्य द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार नियोजन अन् वेळेत कामांना प्राधान्य द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार नियोजन अन् वेळेत कामांना प्राधान्य द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार नियोजन अन् वेळेत कामांना प्राधान्य द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार नियोजन अन् वेळेत कामांना प्राधान्य द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

July 7, 2026
पोलिसांकडून गंभीर चूक झालीच…; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली

पोलिसांकडून गंभीर चूक झालीच…; जळगाव जामोद प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात कबुली

July 7, 2026
‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांचा दणका; थेट मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा डोस!

July 7, 2026
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

भारतीय रिझर्व्ह बँकेत परीक्षेविना नोकरीची संधी; पगार ₹4.10 लाखांपर्यंत

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page