Tuesday, July 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आनंदवार्ता ! पुढील काही तासांत महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री, या जिल्ह्यांना अलर्ट, जळगावात काय स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
पुढील ४८ तास धोक्याचे! १०० किमी वेगाने वादळ घोंगावणार; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्र्रातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी असून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने आगेकूच करत गोव्यात धडक दिली आहे. पुढील काही तासांत महाराष्ट्रातही त्याचे आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, राज्यात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आज कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. तर सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, पालघर या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. दुसरीकडे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. राज्यातील इतर अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणारे वारे यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, मॉन्सूनने केरळमध्ये ४ जून रोजी प्रवेश केला. यंदा त्याचे केरळमधील आगमन नेहमीपेक्षा तीन दिवस उशिरा झाले. शुक्रवारी (५ जून) मॉन्सूनने गोव्याचा काही भाग व्यापला असून, पूर्व-मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, तमिळनाडू तसेच बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांमध्येही प्रगती केली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनची सीमा सध्या पणजी, बंगळूर, सालेम ते पंबन बेट या भागांपर्यंत पोहोचली आहे. पुढील तासांत तळ कोकणासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मॉन्सूनच्या पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले असून, आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उत्तर महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करणार असला, तरी उत्तर महाराष्ट्राचा विचार करता जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत आगामी १६ ते २१ जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आजपासून पुढील दोन दिवस मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळात भरधाव स्कार्पिओची दुचाकीला भीषण धडक; एक वर्षीय चिमुकलीसह चौघांचा जागीच मृत्यू

Next Post

जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरीमुळे राजकीय समीकरणे बदलली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!

जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरीमुळे राजकीय समीकरणे बदलली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वाळू तस्करांविरुद्ध महसूल व पोलीस प्रशासन ऍक्शनमध्ये ; अनेक ट्रॅक्टर्स व डंपर्स केले जप्त

वाळूमाफियांमध्ये खळबळ! जळगाव जिल्ह्यात पोलिसांच्या विशेष मोहिमेत ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 28, 2026
सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; महाराष्ट्रात आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; महाराष्ट्रात आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

“शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण…” मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद!

July 28, 2026
‘जनरेशन गटार’ म्हणत हिंदू तरुणींबद्दल कंगना रनौत नको ते बरळली

‘जनरेशन गटार’ म्हणत हिंदू तरुणींबद्दल कंगना रनौत नको ते बरळली

July 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page