Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगावात तब्बल २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, बोलेरोसह चालक ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 10, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
जळगावात तब्बल २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, बोलेरोसह चालक ताब्यात
बातमी शेअर करा..!

जळगाव: जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत एमआयडीसी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. जळगाव शहरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तब्बल २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि पानमसाल्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत गुटख्याची वाहतूक करणारे मालवाहू बोलेरो वाहन जप्त करण्यात आले असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार सध्या जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यादरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना ९ जून रोजी एक गोपनीय माहिती मिळाली. जळगाव शहरातील महामार्गावरून महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची मोठी वाहतूक केली जाणार असल्याचे या माहितीून समोर आले होते. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. या पथकाने अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान महामार्गावरील जिओ पेट्रोलपंप परिसरात अत्यंत गोपनीयतेने सापळा रचला.

सापळा रचलेला असतानाच, महामार्गावरून एक संशयित बोलेरो मालवाहू वाहन येताना दिसले. पोलिसांनी तत्परता दाखवत ते वाहन शिताफीने अडविले. वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी वाहनाची कसून तपासणी केली.तपासणीदरम्यान वाहनाच्या मागील भागात महाराष्ट्र राज्यात विक्री, साठवणूक आणि वाहतुकीस पूर्णपणे बंदी असलेला ‘विमल सुगंधित गुटखा’ आणि पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी त्वरित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून रीतसर पंचनामा केला.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
प्रतिबंधित विमल गुटखा व पानमसाला: २१ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीच्या एकूण ५८ गोण्या.
महिंद्रा बोलेरो वाहन: ७ लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन (क्रमांक MH-19 CX-3280).
एकूण जप्त मुद्देमाल: २८ लाख ८१ हजार ६०० रुपये.

धरणगावच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या कारवाईदरम्यान पोलिसांनी वाहनाचा चालक जोगेंद्र भिका पाटील (वय वर्ष आणि रा. फुलपाट, ता. धरणगाव) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२७/२०२६ नुसार अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२३, २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस कर्मचारी योगेश घुगे करत आहेत.

यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे व त्यांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडण्यात आली. या कारवाईमुळे जळगावमधील अवैध गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

Next Post

राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विधानपरिषद निवडणूक: नाशिकमध्ये संकटमोचक गिरीश महाजनांचेच दोन खंदे समर्थक आमनेसामने!

अमृतसरातील कार्यक्रमात गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेसकडून टीकेची झोड

June 10, 2026
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर

June 10, 2026
जळगावात तब्बल २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, बोलेरोसह चालक ताब्यात

जळगावात तब्बल २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, बोलेरोसह चालक ताब्यात

June 10, 2026
जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

June 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page