जळगाव । एकीकडे ऑनलाईन फसवणुकीच्या घटना काही केल्या थांबणं दिसत नसून असाहतच मोबाईल सेटिंगमधील ऑटो डाऊनलोड सेटिंग सुरू राहिल्याचा फटका जळगावमधील एकाला बसला असून, चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हॅक करत तब्बल पावणे 5 लाखांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमका प्रकार काय?
जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या निलेश सराफ यांच्या घरातील कपडे धुण्याचे मशीन खराब झाल्याने त्यांनी कपडे धुण्याचे मशीन खरेदी केलेल्या कंपनीला मशीन दुरुस्तीसाठी कॉल केला होता. या कॉल नंतर त्यांना ओटीपी मागण्यात आल्याचं सराफ यांनी म्हटलं. सराफ यांनी संबंधित कंपनीला ओटीपी दिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 4 लाख 65 हजार रुपये काढले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
निलेश सराफ यांच्या बँक खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीनं सायबर पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नितीन गणपुरे यांनी दिली.
दरम्यान, सायबर क्राईमला मी याबाबत गुन्हा नोंदवला असून पोलीस तपास करत आहेत. मात्र, गुगलवरुन कुठल्याही सर्व्हीस सेंटरचे नंबर काढून तुम्ही कुणालाही ओटीपी देऊ नका, असे आवाहन निलेश सराफ यांनी केले आहे.















Discussion about this post