Friday, May 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव औद्योगिक क्षेत्राला ‘डी प्लस ‘ झोन करण्यासाठी अर्थमंत्री सकारात्मक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव औद्योगिक क्षेत्राला ‘डी प्लस ‘ झोन करण्यासाठी अर्थमंत्री सकारात्मक
बातमी शेअर करा..!

जिल्हा वार्षिक योजनेला वाढीव निधी देणार – उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

▪️ उपमुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचे नावीन्यपूर्ण योजनेसाठी आणि सादरीकरणासाठी कौतुक

जळगाव । जळगाव मधील औद्योगिक वसाहत ही ‘डी -झोन’ मध्ये असल्यामुळे इतर जिल्ह्यातील उद्योगांना ज्या सवलती मिळतात, ते इथे मिळत नाहीत. त्यामुळे ‘डी -प्लस’ झोनचा दर्जा मिळावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अनुकूलता दर्शविली. तसेच जिल्ह्याला मंजूर 574.59 कोटी हा नियतव्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून वाढवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ च्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आ. चंद्रकांत सोनावणे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ राजगोपाल देवरा, जिल्ह्याच्या पालक सचिव राजेश कुमार, मंत्रालयात उपस्थित होते तर दूरदृश्यप्रणालीद्वारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नाशिक विभागाचे आयुक्त प्रवीण गेडाम, दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातून आ. सुरेश ( राजीव मामा ) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी विलास शिंदे उपस्थित होते.

राज्यातील सर्व जिल्ह्याचा अभ्यास करूनच निधी देण्यात आला असून जळगाव जिल्ह्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून वाढवून देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. गेल्या पाच वर्षापासून मुदतीत शंभर टक्के निधी खर्च जळगावचा होत आहे तसेच हा निधी विकास कामात खर्च करण्यातही राज्यात जळगाव जिल्हा प्रथम असून सरासरी दरडोईच्या तुलनेत जळगाव जिल्ह्याला कमी निधी मिळत असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.त्यामुळे अतिरिक्त 200 कोटी निधी वाढ करून देण्याची मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात “पालकमंत्री जन सुविधा विकास कार्यक्रम” राबवण्यासाठी दीडशे कोटींची आवश्यकता असल्याचे सांगून पोलीस विभागासाठी पोलीस अधिकारी यांचे वाहन खरेदी कामे वित्त विभागाने घालून दिलेल्या मर्यादेत वाढ करण्याची मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली . जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही जिल्ह्याला निधी वाढवून मिळावा अशी मागणी केली. यावेळी आ. राजीव मामा भोळे यांनीही वाढीव निधीची मागणी केली.

जळगाव व भुसावळ शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून या प्रस्तावास मान्यता द्यावी अशी मागणीही पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुकूलता दर्शविली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा वार्षिक योजनेचे सादरीकरण केले. त्यात जिल्ह्यात कोणते महत्वाची कामे झाली आणि कोणती सुरु आहेत, हे सचित्र दाखवून दिले. जिल्हा वार्षिक योजना 2025-26 साठी कोणत्या महत्वाच्या योजनांसाठी तरतूद केली आहे, याची माहिती दिली. तसेच योजनांचे मूल्यमापन व सामाजिक परिणामांचे विश्लेषण दिले. आरोग्य, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि उपयुक्तता, नागरिक केंद्रित प्रशासन या क्षेत्रासाठी वाढीव निधीची आवश्यकताही या सादरीकरणातून सांगितली.

पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचे कौतुक
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी नाविन्यपूर्ण व अभ्यासपूर्ण विकास कामांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे कौतुक केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र शासनाच्या सिडकोमध्ये विविध पदांसाठी भरती ; तब्बल इतका पगार मिळेल? पात्रता पहा..

Next Post

पाच हजाराची लाच घेताना कृषी विस्तार अधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

पाच हजाराची लाच घेताना कृषी विस्तार अधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
NEET पेपर लीक प्रकरण: ३ मे रोजी झालेली परीक्षा अखेर रद्द; नव्या तारखांची घोषणा लवकरच होणार

चिंता संपली ! ‘नीट’ फेरपरीक्षेची तारीख अखेर जाहीर, या तारखेला होणार परीक्षा

May 15, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

सर्वसामान्यांना झटका ! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांची मोठी वाढ

May 15, 2026
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

May 14, 2026
अजनी धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार ! धरणगावातील ११ गावांची तहान भागणार

अजनी धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार ! धरणगावातील ११ गावांची तहान भागणार

May 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page