भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय तटरक्षक दलाने २०२६ मधील सेलर (जनरल ड्युटी), सेलर (डोमेस्टिक ब्रांच), मेकॅनिक आणि हायजिनिस्ट-१ या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. CGEPT बॅच १/२०२७ आणि २/२०२७ अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांना २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

या भरतीमध्ये सेलर (जनरल ड्युटी), सेलर (डोमेस्टिक ब्रांच), मेकॅनिक आणि हायजिनिस्ट-१ या पदांचा समावेश आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
सेलर (जनरल ड्युटी) पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सेलर (डोमेस्टिक ब्रांच) पदासाठी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हायजिनिस्ट-१ पदासाठी केंद्र किंवा राज्य सरकारने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळातून मॅट्रिक्युलेशन किंवा आयटीआय अथवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे.
मेकॅनिक पदासाठी दहावी उत्तीर्ण असण्यासोबत AICTE मान्यताप्राप्त इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) इंजिनिअरिंगमधील ३ किंवा ४ वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे. याशिवाय दहावी-बारावी उत्तीर्ण आणि संबंधित अभियांत्रिकी शाखेतील २ किंवा ३ वर्षांचा मान्यताप्राप्त डिप्लोमा असलेले उमेदवारही पात्र ठरू शकतात.
वयोमर्यादा किती?
सेलर पदांसाठी उमेदवारांचा जन्म १ मे २००५ ते १ मे २००९ या कालावधीत झालेला असावा.
हायजिनिस्ट-१ पदासाठी उमेदवारांचा जन्म १ नोव्हेंबर २००५ ते १ ऑक्टोबर २००९ दरम्यान झालेला असावा.
तर मेकॅनिक पदासाठी उमेदवारांचा जन्म १ नोव्हेंबर २००२ ते १ ऑक्टोबर २००९ या कालावधीत झालेला असावा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
अर्ज शुल्क
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना ५५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
२१ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज करावा. अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शुल्क भरणे आणि अर्जाची प्रत भविष्यातील संदर्भासाठी जतन करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑक्टोबर २०२६ आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरील अधिसूचना आणि पदनिहाय पात्रता तपासणे महत्त्वाचे आहे.















Discussion about this post