आयकर विभाग, पुणे येथे क्रीडा कोट्यातून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड-II, टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांच्या एकूण 85 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र खेळाडूंना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2026 आहे.
या भरतीमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड-IIची 6 पदे, टॅक्स असिस्टंटची 40 पदे आणि मल्टी टास्किंग स्टाफची 39 पदे उपलब्ध आहेत.
शैक्षणिक पात्रता
स्टेनोग्राफर ग्रेड-II : उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून संबंधित क्रीडा पात्रता असणे गरजेचे आहे.
टॅक्स असिस्टंट : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. तसेच संबंधित क्रीडा पात्रता आवश्यक आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ : उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा आणि संबंधित क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे.
क्रीडा पात्रता
या भरतीसाठी राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू, आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू, अखिल भारतीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेले खेळाडू तसेच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू पात्र ठरू शकतात. क्रीडा पात्रतेबाबतची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे.
वयोमर्यादा
1 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय स्टेनोग्राफर ग्रेड-II आणि टॅक्स असिस्टंट पदांसाठी 18 ते 27 वर्षे, तर MTS पदासाठी 18 ते 25 वर्षे असावे. नियमानुसार SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 10 वर्षांपर्यंत, तर इतर पात्र प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.
अर्ज शुल्क आणि नोकरीचे ठिकाण
या भरतीसाठी अर्ज शुल्क 200 रुपये असून अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण पुणे राहणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 सप्टेंबर 2026
पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आयकर विभागाची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचून क्रीडा पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटी तपासाव्यात.















Discussion about this post