जळगाव । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. जिल्ह्यात महायुतीचे संख्याबळ प्रचंड असून विरोधकांना कोणतीही संधी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नंदकिशोर महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. नगरपरिषद, महानगरपालिका आणि इतर स्थानिक संस्थांमधील बहुतांश सदस्य महायुतीशी संबंधित असल्याने विधान परिषद निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ना. गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर थेट हल्लाबोल करताना सांगितले की, “नगरपरिषद, महानगरपालिका आणि विधानसभेला विरोधकांची जी दैना झाली होती, त्यापेक्षाही वाईट परिस्थिती या विधान परिषद निवडणुकीत दिसेल. देशातील आणि राज्यातील जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. याच विकासकामांच्या जोरावर आम्ही पूर्ण ताकदीने सर्व जागा खिशात घालू.”
संजय राऊतांवर मिश्कील आणि आक्रमक निशाणा
खासदार संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधत ना. महाजन मिश्कील आणि आक्रमक सुरात म्हणाले, “काहीही बडबड करण्यापेक्षा आता तुम्हाला प्रचारासाठी चांगला वेळ आहे, तो सत्कारणी लावा आणि किमान एखादी तरी जागा निवडून आणून दाखवा. त्यांचे ‘बोलबच्चन’ नेते फक्त तोंडसुख घेण्याचे काम करत आहेत. मी तर त्यांना आधीच आव्हान दिले होते की, आधी एखादी महानगरपालिका तरी निवडून आणून दाखवा. आपली लोकं यांना सांभाळता येत नाहीत.” असा टोला महाजन यांनी लगावला.















Discussion about this post