Wednesday, September 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दुष्काळ उपाययोजना उपसमितीत गिरीश महाजन-गुलाबराव पाटलांचा समावेश; जळगावच्या शेतकऱ्यांना मदतीची आशा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 23, 2026
in जळगाव जिल्हा
0
गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव । पावसाच्या लहरीपणामुळे जळगाव जिल्ह्यातसह राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने मात करण्यासाठी आणि उपाययोजना राबवण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

विशेष या समितीत जळगावचे प्रतिनिधीत्व करणारे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ठोस मदतीची उपाययोजना राबविल्या जाण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, चाळीसगाव, जामनेर आणि बोदवड या तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ७० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाचे कमी आणि अनियमित वितरण झाल्याचा फटका खरीप पिकांना बसला आहे. उडीद, मूग, सोयाबीन, तीळ, मका आणि ज्वारी या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक भागांत कोरडवाहू कपाशीची वाढही खुंटली असून त्याचाही उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

रब्बी हंगामासमोरही आव्हान

खरीप हंगामावर पावसाच्या अनियमिततेचा परिणाम झाल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष रब्बी हंगामाकडे लागले आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर, कालव्यांच्या आवर्तनांचे नियोजन तसेच पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देणे या बाबींवर आगामी काळात भर द्यावा लागणार आहे. राज्य सरकारकडून पुढील सात ते आठ महिन्यांसाठी पाणी आणि चारा नियोजन करण्याची माहिती देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीत जळगावच्या दोन मंत्र्यांचा समावेश

दुष्काळसदृश्य परिस्थितीतील उपाययोजनांसाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील. समितीत जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अन्य मंत्र्यांचा समावेश आहे.

समितीसमोर दुष्काळसदृश्य भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन पाणी, चारा आणि शेतीशी संबंधित उपाययोजनांबाबत निर्णय घेण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कमी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदत आणि उपाययोजना जाहीर होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकृत माहितीनुसार गुलाबराव पाटील हे सध्या या विभागाचे मंत्री आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दीपनगरजवळ भीषण अपघात! भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघे ठार

Next Post

चार्जिंगच्या बहाण्याने घरात घुसून महिलेच्या गळ्यावर सर्जिकल ब्लेडने वार; जळगावातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

चार्जिंगच्या बहाण्याने घरात घुसून महिलेच्या गळ्यावर सर्जिकल ब्लेडने वार; जळगावातील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

चार्जिंगच्या बहाण्याने घरात घुसून महिलेच्या गळ्यावर सर्जिकल ब्लेडने वार; जळगावातील घटना

September 23, 2026
गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

दुष्काळ उपाययोजना उपसमितीत गिरीश महाजन-गुलाबराव पाटलांचा समावेश; जळगावच्या शेतकऱ्यांना मदतीची आशा

September 23, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

दीपनगरजवळ भीषण अपघात! भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघे ठार

September 23, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

८०० रुपयांसाठी आत्तेभावाने संपवले मामेभावाला; भडगावातील खळबळजनक घटना

September 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page