मुंबई । महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या १६ जागांसाठी अखेर द्वैवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये ६ जागा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, येत्या १८ जून २०२६ रोजी या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून संबंधित जिल्ह्यांमध्ये तातडीने आचारसंहिता लागू झाली आहे.
विधान परिषदेच्या ज्या १६ आमदारांच्या जागा भरल्या जाणार आहेत, त्यामध्ये सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद, परभणी आणि संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. ‘या’ १६ मतदारसंघांमध्ये होणार निवडणूक आणि आचारसंहिता लागू निवडणूक जाहीर झाल्यामुळे संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता तातडीने लागू झाली आहे.
निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिकृत अधिसूचना जारी होणार – २५ मे २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ०१ जून २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्जांची छाननी – ०२ जून २०२६ (मंगळवार)
अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ०४ जून २०२६ (गुरूवार)
मतदान (Date of Poll) -१८ जून २०२६ (गुरूवार) (सकाळी ८ ते दुपारी ४)
मतमोजणी (Counting of Votes) – २२ जून २०२६ (सोमवार)














Discussion about this post