जळगाव । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर खोटे बोलण्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यावर जोरदार पलटवार केला आहे. “मुख्यमंत्र्यांचे आमच्यावर खोटे बोलण्याचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
जळगावातील धनाजी नाना विद्या प्रबोधिनी येथे स्वर्गीय चौधरी यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्त ते आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी सपकाळ म्हणाले, “वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे कोणी म्हटले होते? काल नाशिकमध्ये ढगफुटी होईल, असा अंदाज मुख्यमंत्री व्यक्त करत होते, मात्र तसे झाले नाही. तसेच अजित पवार यांच्यासोबत कधीही युती होणार नाही, ते ‘चक्की पिसिंग’ करतील, असेही त्यांनी पूर्वी म्हटले होते. पुढे काय झाले, हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे.”
मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी आपल्या भूमिकांमध्ये बदल केला असून, त्यामुळे खोटे नेमके कोण बोलते, हे जनतेला चांगलेच माहीत आहे, असा टोला सपकाळ यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.














Discussion about this post