जळगाव । खान्देश आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन उधना–ब्रह्मपुरी–उधना अमृत भारत एक्स्प्रेस ही गाडी त्रि-साप्ताहिक ऐवजी आता दररोज चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे जळगाव, भुसावळसह संपूर्ण खान्देशातील प्रवाशांनामोठा दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, ही गाडी ९ जुलै २०२६ पासून नियमितपणे दररोज खालील वेळेत धावणार आहे:
गाडी क्रमांक १९०२१ (उधना ते ब्रह्मपुरी):
ही गाडी दररोज सकाळी ०७:१० वाजता उधना (सुरत) येथून सुटेल. त्याच दिवशी दुपारी १२:३५ वाजता जळगाव आणि दुपारी ०१:०५ वाजता भुसावळ स्थानकावर पोहोचेल. यानंतर पुढील दिवशी दुपारी ०१:५५ वाजता ब्रह्मपुरी येथे तिचा प्रवास पूर्ण होईल.
गाडी क्रमांक १९०२२ (ब्रह्मपुरी ते उधना – परतीचा प्रवास):
परतीच्या प्रवासात ही ट्रेन ब्रह्मपुरी येथून रात्री ११:४५ वाजता रवाना होईल. पुढील प्रवासात ती तिसऱ्या दिवशी पहाटे ०२:०० वाजता भुसावळ आणि पहाटे ०२:३८ वाजता जळगाव येथे पोहोचेल. त्यानंतर सकाळी ०८:४५ वाजता उधना येथे दाखल होईल.
आतापर्यंत ही गाडी आठवड्यातून केवळ तीन दिवस धावत असल्याने प्रवाशांना आरक्षण (Reservation) मिळण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. मात्र, आता ही सेवा दररोज उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. विशेषतः सुरत-गुजरातकडे जाणारे व्यापारी, नोकरदार, दक्षिण व पूर्व भारतात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि पर्यटकांना या नियमित सेवेचा मोठा फायदा होणार आहे.
या एक्स्प्रेसला बार्डोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खारियार रोड, कांताबांजी, तितलागड, केसिंगा, मुनिगुडा, रायगडा, पार्वतीपूरम, बोब्बिली, विजयानगरम, श्रीकाकुलम रोड आणि पालासा या महत्त्वाच्या स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबा असणार आहे.















Discussion about this post