Thursday, November 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon : अवघ्या १० हजारांच्या लाचेने फुटले ५.१६ कोटींच्या संपत्तीचे बिंग, जळगाव जिपच्या अधिकाऱ्याच्या मालमत्तेचा आकडा समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 5, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात ‘दक्षता जनजागृती सप्ताह २०२५’ उत्साहात सुरू
बातमी शेअर करा..!

जळगाव । शासकीय कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकाऱ्याच्या मालमत्तेचा मोठा आकडा समोर आला आहे. सतीश मन्सुलाल शिसोदे यांच्या निवासस्थानासह बँकेतील लॉकरची झडती घेतल्यानंतर तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांचा मुद्देमाल उघड झाला आहे. यात दोन घरे, लाखोंची रोकड, साडेतीन कोटींहून अधिक किमतीचे सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांचा समावेश आहे. दहा हजारांच्या लाचप्रकरणातून कोट्यवधींच्या संपत्तीचा तपशील समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभागात वर्ग-१ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सतीश मन्सुलाल शिसोदे (वय ५५, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, आदर्शनगर, जळगाव) यांना २ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते. एका कामाच्या मोबदल्यात सहकारी अभियंत्याच्या माध्यमातून १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मात्र, लाच स्वीकारताना झालेल्या कारवाईनंतर तपास यंत्रणेने त्यांच्या मालमत्तेकडे लक्ष केंद्रित केले. निवासस्थानाची झडती आणि बँक लॉकरची तपासणी केली असता शिसोदे यांच्या संपत्तीचा मोठा तपशील समोर आला.

घरात रोकड, दोन मालमत्तांचा तपशील

एसीबीच्या पथकाने शिसोदे यांच्या आदर्शनगर येथील निवासस्थानी तपासणी केली. यावेळी ७ लाख ९७ हजार ९२० रुपये रोख स्वरूपात मिळाले. याशिवाय त्यांच्या मालकीची दोन घरे असल्याचे समोर आले. पहिल्या घराची किंमत ४५ लाख रुपये, तर दुसऱ्या घराची किंमत ६५ लाख रुपये असल्याचे तपासात आढळले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि अन्य मौल्यवान वस्तूंचे मूल्य २४ लाख ३९ रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करता घरझडतीत एकूण १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपयांची मालमत्ता आढळून आली.

शिसोदे यांच्या जळगाव सहकारी बँकेतील लॉकरची तपासणी केली असता मौल्यवान दागिन्यांचा मोठा साठा आढळून आला. त्यामध्ये २ हजार ५२४.१८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या बिस्किटांचा समावेश आहे. चेन, पेंडल, लॉकेट, बांगड्या तसेच सोन्याच्या पट्ट्यांचाही यात समावेश असून, या सोन्याचे मूल्य ३ कोटी ५१ लाख ८९ हजार १५३ रुपये इतके आहे.

याशिवाय लॉकरमध्ये ११ हजार ६३३.७ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू आढळल्या. चांदीची बिस्किटे, वाट्या, ताटे आणि इतर वस्तूंची किंमत १९ लाख ५३ हजार ९९१ रुपये आहे. विशेष म्हणजे, १०१.०२ ग्रॅम वजनाचे प्लॅटिनमचे दागिनेही पथकाच्या हाती लागले. त्यांचे मूल्य ३ लाख ५५ हजार २८६ रुपये आहे. अशा प्रकारे केवळ बँक लॉकरमधील सोन्या-चांदीसह प्लॅटिनमच्या दागिन्यांची एकूण किंमत ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपये झाली आहे.

एकूण संपत्तीचा आकडा ५ कोटी १६ लाखांवर

घरझडती आणि बँक लॉकरमधून मिळालेल्या मालमत्तेचे मूल्य एकत्रित केल्यानंतर ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांचा आकडा समोर आला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १० हजार रुपयांच्या लाच स्वीकारण्याच्या आरोपातून सुरू झालेल्या कारवाईत अधिकाऱ्याच्या घरात आणि बँक लॉकरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आढळल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. ही संपत्ती कशी आणि कोणत्या स्रोतांतून जमा करण्यात आली, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लॉकर तपासणी पथकात पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्यासह सुरेश पाटील, किशोर महाजन, संगिता पवार, राकेश दुसाने आणि सचिन चाटे यांनी सहभाग घेतला. तर घरझडती पथकात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सुनील वानखेडे आणि मनोज पाटील यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

SIR फॉर्ममधून घोषणापत्र हटवताच अभिजीत दीपके आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्यावर साधला निशाणा!

Next Post

नंदुरबारमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीआधी महायुतीतच बिघाडी? भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी स्वबळाच्या तयारीत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विधान परिषदेसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला? कोणाच्या वाट्याला किती जागा?

नंदुरबारमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीआधी महायुतीतच बिघाडी? भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी स्वबळाच्या तयारीत

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावकरांनो लक्ष द्या! खान्देश मॉलकडून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद

जळगावकरांनो लक्ष द्या! खान्देश मॉलकडून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद

November 5, 2026
जळगावसह दहा रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ; हे आहे कारण?

दिवाळीच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मुंबईतील ५ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद; १५ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध

November 5, 2026
इंडियन बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी निघाली भरती? जाणून घ्या पात्रता

पदवीधरांना इंडियन बँकेत नोकरीची मोठी संधी! १,५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती

November 5, 2026
जळगावात वाळू माफियांवर पोलिसांचा दणका; ५ गुन्हे दाखल, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात वाळू माफियांवर पोलिसांचा दणका; ५ गुन्हे दाखल, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

November 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page