अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नसून, शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाही मोठा धक्का बसला आहे. अनेक देशांनी मध्यस्थी करत दोन्ही राष्ट्रांना युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, नुकताच दोन्ही बाजूंनी एकमेकांचे प्रस्ताव फेटाळून लावल्याने युद्धबंदीची आशा धूसर झाली आहे.
दरम्यान, युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल तब्बल ३ डॉलरची वाढ झाली आहे. त्यामुळे ऊर्जा संकट अधिक गडद होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
२८ फेब्रुवारी रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर मोठा हल्ला केला होता. त्यानंतर सुरू झालेले युद्ध आता दोन महिन्यांहून अधिक काळ चालू आहे. मात्र, परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसून तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump शांततेच्या प्रस्तावाची वाट पाहत होते. इराणकडून लेबनॉनमधील संघर्ष थांबवणे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुढे करत प्रस्ताव देण्यात आला. मात्र, अमेरिकेने तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतर इराणनेही अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला.
या घडामोडींमुळे जागतिक बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. विशेषतः होर्मुझ खाडीतील तणावामुळे एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. युद्धातून मार्ग निघण्याऐवजी परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.















Discussion about this post