Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

केंद्रीय पथकाकडून चाळीसगाव मधील दुष्काळाची पाहणी ; कापूस व केळी पीक शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 14, 2023
in जळगाव जिल्हा
0
केंद्रीय पथकाकडून चाळीसगाव मधील दुष्काळाची पाहणी ; कापूस व केळी पीक शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
बातमी शेअर करा..!

जळगाव | चाळीसगाव तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सर्वत्र चारा, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिके जळाली असून, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने गुरुवारी (ता.१४) प्रातिनिधिक स्वरूपात बिलाखेड, डोणदिगर, हिरापूर, शेवरी, रोहिणी व खडकी या गावातील दुष्काळी भागाची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकात केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त एच.आर.खन्ना, सांख्यिकी विभागाचे सहायक संचालक जगदीश शाहू यांचा समावेश होता. तर त्यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी महेश अवताडे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.गर्जे, चाळीसगाव प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

केंद्रीय पथकाने चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथील शेतकरी निलाबाई अनिल चौधरी यांच्या मका पीक व चंद्रकांत किसन चौधरी, भीमराव बाजीराव दरेकर यांच्या कापूस पीक क्षेत्राची पाहणी केली. डोणदिगर येथील शेतकरी बारकू शिवराम मोरे, भाऊसाहेब काशीनाथ पाटील यांच्या कापूस पीक क्षेत्राची पाहणी केली.‌ हिरापूर येथील शेतकरी आबा रामदास देवरे, मिनाबाई भानुदास जगताप यांच्या कापूस व सुदाम पंडित निकुंभ यांच्या केळी पीक क्षेत्राची पाहणी केली. शेवरी येथील शेतकरी रामकृष्ण गुलाब राठोड व निंबा नथ्थू पाटील यांच्या कापूस पीक क्षेत्राची पाहणी केली. खडकी येथील शेतकरी संजय उत्तम डोखे यांच्या म्हैस गोठ्याची ही पथकाने पाहणी केली.

तालुक्यातील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी पावसाळ्यामध्ये परिसरात एकदाही मोठा पाऊस झाला नाही. काही भागात हलक्या पावसाच्या सरी पडल्याचे सांगत खरीप अथवा रब्बी हंगामात कोणतीही पिके बहरली नाहीत.कापसासह केळीचे पीक जळू लागले आहे. सध्या या भागात पाण्याची पातळी खूप खोलवर गेली असून विहिरी, बोरवेल, पाझर तलाव कोरडे पडले आहेत. माणसांप्रमाणेच जनावरांनाही चारापाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळणेही गरजेचे असल्याचे व्यथा शेतकऱ्यांनी पथकापुढे मांडली.

पथकाने याची केली पाहणी

▫️जळालेल्या केळी पीक, उध्वस्त झालेली कापूस पीके

▫️पाझर तलाव, कोरड्या पडलेल्या विहिरी

▫️शेतकऱ्यांसाठी सध्या असलेल्या पाण्याची व्यवस्था

▫️जनावरांना चारा कुठून आणता, एकरी किती झालेले नुकसान.

▫️पाण्याच्या पातळीची खोली किती?

▫️विहिरी बोअरवेलचे प्रमाण किती?

▫️पिण्याचे पाणी किती दिवसाने मिळते, त्याची साठवणूक कशी करता ?

▫️पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ मिळत‌ आहे का ?

चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ पडला असून, येथील परिस्थिती किती गंभीर आहे याची पाहणी करण्यासाठी आम्हाला केंद्र शासनाने याठिकाणी पाठवले आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी करून हा अहवाल शासनास सादर करणार आहोत. याबाबत पुढील निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल. अशी ग्वाही एच.आर.खन्ना यांनी यावेळी शेतकऱ्यांपुढे दिली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

या उपक्रमासाठी जळगाव विद्यापीठ व आयआयटी मुंबई यांच्यात झाला सामंजस्य करार

Next Post

केंद्र शासनाच्या नोकरीची संधी ! अणुऊर्जा विभागात मोठी भरती! आताच अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

केंद्र शासनाच्या नोकरीची संधी ! अणुऊर्जा विभागात मोठी भरती! आताच अर्ज करा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातील ब्लॉकमुळे चार गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल

April 20, 2026
भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 20, 2026
महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत… ; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

ज्याला तुम्ही महिला आरक्षण विधेयक म्हणताय ते..; महिला आरक्षणावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page