Saturday, June 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भाडेपट्ट्यावरील सरकारी जमिनींवर सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत हे आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 20, 2026
in महाराष्ट्र
0
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी
बातमी शेअर करा..!

मुंबई : राज्यातील भाडेपट्ट्यावर दिलेल्या शासकीय जमिनींवर स्वतःचा मालकी हक्क सांगणाऱ्या संस्था, कंपन्या, प्राधिकरणे आणि व्यक्तींना राज्य सरकारने मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, अशा सर्व जमिनींच्या अधिकार अभिलेखात ‘कब्जेदार’ म्हणून केवळ ‘महाराष्ट्र शासन’ अशीच नोंद राहणार आहे.

याबाबत महसूल विभागाने परिपत्रक जारी केले असून, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पुढील तीन महिन्यांत विशेष मोहीम राबवून भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या नोंदी अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाडेपट्टाधारकांच्या नावावर नोंदी झाल्याचा प्रकार

राज्य शासनाकडून अनेक व्यक्ती व संस्थांना ३०, ९९ किंवा ९९९ वर्षांच्या कालावधीसाठी जमीन भाडेपट्ट्यावर दिली जाते. मात्र, अनेक ठिकाणी अधिकार अभिलेखातील कब्जेदार सदरी शासनाच्या नावाऐवजी भाडेपट्टाधारकांची नावे नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित जमीन खासगी मालकीची असल्याचा दावा केला जात असून, अनेक न्यायालयीन वाद निर्माण झाले आहेत.

‘इतर अधिकार’ सदरी होणार नोंद

सरकारच्या नव्या निर्णयानुसार, कब्जेदार म्हणून फक्त ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद राहील. तर भाडेपट्टाधारकाचे नाव, भाडेपट्ट्याचा कालावधी आणि संबंधित अटींची माहिती ‘इतर अधिकार’ या सदरी नमूद करण्यात येणार आहे.

तीन महिन्यांत मोहीम पूर्ण करण्याचे आदेश

महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष मोहीम राबवून अवघ्या तीन महिन्यांत या नोंदी दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ पूर्वी ५० वर्षे किंवा नूतनीकरणाच्या पर्यायासह देण्यात आलेल्या भाडेपट्ट्यांबाबत ‘भोगवटादार वर्ग-२’ अशी नोंद ३० दिवसांत करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मुंबईतील सरकारी जमिनींवरही कडक अंमलबजावणी

मुंबई शहरातील शासकीय जमिनींसाठी लागू असलेल्या नियमांनुसार, अस्तित्वातील सर्व पट्ट्यांवरील हस्तांतरण निर्बंधांच्या नोंदी तातडीने अधिकार अभिलेखात घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणच्या सरकारी जमिनींवर मालकी हक्क सांगण्याच्या प्रयत्नांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या मालकीबाबतचा संभ्रम दूर होण्यास मदत होणार असून, सरकारी मालमत्तेचे संरक्षण आणि महसूल नोंदींमध्ये पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

BSNL मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; १०० जागांची भरती, ३ जुलैपर्यंत अर्ज करा

Next Post

दुर्दैवी बातमी ! गणपतीपुळे समुद्रात छत्रपती संभाजीनगरचे ८ पर्यटक बुडाले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दुर्दैवी बातमी ! गणपतीपुळे समुद्रात छत्रपती संभाजीनगरचे ८ पर्यटक बुडाले

दुर्दैवी बातमी ! गणपतीपुळे समुद्रात छत्रपती संभाजीनगरचे ८ पर्यटक बुडाले

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा २० वर्षांनंतर निकाल; माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा २० वर्षांनंतर निकाल; माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष

June 20, 2026
दुर्दैवी बातमी ! गणपतीपुळे समुद्रात छत्रपती संभाजीनगरचे ८ पर्यटक बुडाले

दुर्दैवी बातमी ! गणपतीपुळे समुद्रात छत्रपती संभाजीनगरचे ८ पर्यटक बुडाले

June 20, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

भाडेपट्ट्यावरील सरकारी जमिनींवर सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत हे आदेश

June 20, 2026
भारत संचार निगम लिमिटेडमध्ये १२० पदांसाठी भरती ; दरमहा ५०,५०० रुपये पगार मिळणार

BSNL मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; १०० जागांची भरती, ३ जुलैपर्यंत अर्ज करा

June 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page