रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेले ८ पर्यटक समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यातील ३ जणांना वाचवण्यात यश आले असून ५ जण अद्यापही बेपत्ता आहेत. ही घटना आज, शनिवारी (२० जून २०२६) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून काही पर्यटक गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. यातील एकूण ८ जण सकाळी समुद्रात उतरले होते. मात्र, भरती आणि समुद्राच्या पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात वाहून जाऊ लागले.
समुद्रात पर्यटक बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक जीवरक्षक आणि नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. ८ पैकी ३ पर्यटकांना सुखरूपपणे समुद्राबाहेर काढण्यात यश आले आहे. ३ जणांचे प्राण वाचले आहेत. मात्र, उर्वरित ५ जण अद्यापही बेपत्ता आहेत. घटनास्थळी पोलीस व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. बेपत्ता असलेल्या पाचही पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमार, जीवरक्षक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. अद्याप कोणाचाही ठावठिकाणा लागलेला नसून, शोधकार्य वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात आणि पर्यटकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post