नवी दिल्ली । सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या संघटनेचे संस्थापक अभिजित दिपके आज शनिवारी सकाळी अमेरिकेतून थेट राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या आंदोलनाचे नेतृत्व ते करणार आहेत.
दिल्लीत उतरताच अभिजित दिपके यांनी जंतर-मंतरवर आंदोलनाची अधिकृत परवानगी मिळवण्यासाठी थेट पार्लियामेंट स्ट्रीट (संसद मार्ग) पोलीस स्टेशन गाठले. कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर दिल्ली पोलिसांकडून त्यांना जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे.
अभिजित दिपके यांनी या आंदोलनाचे वर्णन ‘एक शांततापूर्ण आणि घटनात्मक आंदोलन’ असे केले आहे. CJP ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, “पोलीस अधिकाऱ्यांनी विमानतळावरच त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे प्रशासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, आता आंदोलकांनी संसद मार्ग पोलीस ठाण्याऐवजी थेट जंतर-मंतर मैदानावर पोहोचावे.”
मुख्य मागण्या काय आहेत?
भारतात पाऊल ठेवताच अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवरून थेट सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या जुन्या मागण्यांचा पुनरुच्चार करत काही मागण्या लावून धरल्या आहेत. त्यात देशाच्या शिक्षणमंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रलंबित मुद्द्यांवर केंद्र सरकारने कठोर आणि ठोस कारवाई करावी यांचा समावेश आहे.
दरम्यान अभिजीत दीपके यांच्या आंदोलनापूर्वी केंद्र सरकरची डोकेदुखी वाढली आहे. विशेष तामिळनाडूत भाजपमध्ये एका पाठोपाठ एक राजीनामा सत्र सुरू झाले आहे. राजीनामा देण्याची नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. नेतेच नाही तर कार्यकर्ते, पदाधिकारी हे सुद्धा पक्षाला रामराम ठोकत आहेत. अण्णामलाई यांच्या निर्णयाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून दक्षिणेत भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.















Discussion about this post