जळगाव : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भडगाव येथे दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये युवा शक्ति फाउंडेशन व क्वेस क्रॉप प्रा. लि., पुणे यांसारखे नामांकित उद्योजक सहभागी होणार असून, १०वी, १२वी, आयटीआय, पदवीधर आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी संकेतस्थळावरील रिक्तपदांसाठी आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करून अर्ज करावा. तसेच, ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनीही सर्व शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे घेऊन मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहावे.
याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन अथवा ०२५७-२९५९७९० या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.















Discussion about this post