मुंबई : भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) ने पॅरामेडिकल श्रेणीतील विविध गट ‘ब’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई येथील BARC आणि कोलकाता येथील रेडिएशन मेडिसिन रिसर्च सेंटर (RMRC) येथे ही भरती होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार १८ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भरतीची पदे व वेतन
वैज्ञानिक सहाय्यक/सी (मानसशास्त्रज्ञ) – १ जागा, वेतन स्तर-७, प्रारंभिक वेतन ₹44,900
वैज्ञानिक सहाय्यक/बी (पॅथॉलॉजी) – १ जागा, वेतन स्तर-६, प्रारंभिक वेतन ₹35,400
वैज्ञानिक सहाय्यक/बी (रेडिओग्राफी) – २ जागा, वेतन स्तर-६, प्रारंभिक वेतन ₹35,400
वैज्ञानिक सहाय्यक/बी (न्यूक्लियर मेडिसिन टेक्नोलॉजिस्ट) – २ जागा, वेतन स्तर-६, प्रारंभिक वेतन ₹35,400
शैक्षणिक पात्रता ?
मानसशास्त्रज्ञ पदासाठी मानसशास्त्र विषयातील पदवी आणि संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
पॅथॉलॉजी पदासाठी बी.एस्सी.सोबत डीएमएलटी (DMLT) किंवा मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीमधील पदवी आवश्यक आहे.
रेडिओग्राफी पदासाठी बी.एस्सी. (रेडिओग्राफी) किंवा संबंधित डिप्लोमा आवश्यक आहे.
न्यूक्लियर मेडिसिन टेक्नोलॉजिस्ट पदासाठी न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजीमधील बी.एस्सी. तसेच संबंधित डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक आहे.
बहुतांश पदांसाठी किमान ६० टक्के गुण अनिवार्य आहेत.
वयोमर्यादा
उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि इतर पात्र प्रवर्गांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड प्रामुख्याने वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मात्र, अर्जांची संख्या अधिक असल्यास संबंधित विषयातील स्क्रीनिंग परीक्षा घेतली जाऊ शकते. मुलाखत किंवा परीक्षा हिंदी किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी कोणत्याही एका भाषेत देता येणार आहे.
अर्ज शुल्क
सर्वसाधारण, ओबीसी आणि इतर प्रवर्ग: ₹150
एससी, एसटी आणि महिला उमेदवार: ₹150
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया तपासून वेळेत ऑनलाइन अर्ज करावा. BARC सारख्या देशातील प्रतिष्ठित संशोधन संस्थेत नोकरीची संधी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची मानली जात आहे.















Discussion about this post