Monday, September 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी; मृतांचा आकडा आणखी भीती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 6, 2026
in क्राईम, राष्ट्रीय
0
जळगाव जिल्ह्यात विदेशी, बिअर, वाईन दारू विक्रीत वाढ ; महसूलात 34 टक्के वाढ
बातमी शेअर करा..!

सागर : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी दारूच्या सेवनाने मोठी दुर्घटना घडली असून, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने यातील १० मृत्यूंची पुष्टी केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेत सुमारे ३५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने गंभीर रुग्णांना बुंदेलखंड मेडिकल कॉलेज तसेच सागर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बाधित गावांमध्ये प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सागर जिल्ह्यातील नौरोजा आणि घुघरा खुर्द या गावांमध्ये विषारी दारूच्या सेवनाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. या गावांमध्ये दारूचे सेवन केलेल्या नागरिकांची तपासणी केली जात असून, लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल केले जात आहे.प्राथमिक तपासणीत मृत्यूमागे मेथिल अल्कोहोलच्या सेवनाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या काही शवविच्छेदन अहवालांमध्येही मेथिल अल्कोहोल सेवनाचे प्राथमिक संकेत मिळाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस तपासात या प्रकरणाला आता आंतरराज्यीय पुरवठ्याची जोड मिळत असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील ललितपूर येथून दारूचा पुरवठा झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून, ललितपूरमधील संबंधित नेटवर्कचाही तपास केला जात आहे.रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काही रुग्णांच्या शरीरावर विषबाधेची गंभीर लक्षणे दिसून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संशयित रुग्णांसाठी बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सहा दारूची दुकाने सील

घटनेनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत परिसरातील सहा दारूची दुकाने सील केली आहेत. या दुकानांमधील दारूचे नमुने घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, अवैध दारू विक्री आणि पुरवठा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सागरचे वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी बाधित गावांमध्ये दाखल झाले असून, त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेत तपासाला गती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना तातडीने चौकशीचे निर्देश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच अशा घटनांबाबत सरकारची भूमिका ‘शून्य सहनशीलतेची’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पारोळ्यात नाकाबंदीत कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीचा पर्दाफाश; दोघे ताब्यात

Next Post

एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवाला महायुतीचे नेते गैरहजर; गिरीश महाजन म्हणाले,..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले

एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवाला महायुतीचे नेते गैरहजर; गिरीश महाजन म्हणाले,..

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची मोठी संधी; 175 जागांसाठी भरती, पात्रता काय?

September 7, 2026
MPSCच्या कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; हजारो विद्यार्थी रस्त्यावर

MPSCच्या कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; हजारो विद्यार्थी रस्त्यावर

September 7, 2026
मंत्री गिरीश महाजनांसमोरच पदाधिकाऱ्याने रक्षा खडसेंना खडेबोल सुनावले

रक्षा खडसे बैठकीतून बाहेर पडल्या..; जळगावात भाजपमध्ये अंतर्गत वादाची चर्चा, गिरीश महाजन म्हणाले..

September 7, 2026
जन्म-मृत्यू नोंदणीचे नियम बदलले; उशिरा नोंदणीसाठी नवा नियम लागू

जन्म-मृत्यू नोंदणीचे नियम बदलले; उशिरा नोंदणीसाठी नवा नियम लागू

September 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page