Tuesday, October 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कूपनलिकेच्या नोंदीसाठी शेतकऱ्याकडून लाच घेताना आमोद्याचा तलाठी रंगेहात जाळ्यात!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 6, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ
बातमी शेअर करा..!

यावल । एकीकडे निसर्गाच्या कोपामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या भीषण सावटाखाली आहे. शेतकरी पिकांच्या नुकसानीमुळे आणि आर्थिक विवंचनेमुळे आधीच कोलमडून गेला असताना, दुसरीकडे महसूल प्रशासनातील लाचखोर मात्र शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात मग्न असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. सातबारा उताऱ्यावर कूपनलिकेची नोंद करण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आमोदा (ता. यावल) येथील तलाठी शैलेश झोटे याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रंगेहात पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर कूपनलिकेची नोंद करण्याचे काम प्रलंबित होते. संबंधित नोंद करण्यासाठी तलाठी शैलेश झोटे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याबाबत शेतकऱ्याने थेट जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक पडताळणी केली. त्यानंतर तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर सापळा रचण्याचे नियोजन करण्यात आले. चर्चेनंतर लाचेची रक्कम एक हजार रुपये ठरविण्यात आली. ही रक्कम स्वीकारण्यासाठी आमोदा ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील ठरलेल्या ठिकाणी भेटण्याचे निश्चित झाले.

मंगळवारी तक्रारदार ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. यावेळी तलाठी शैलेश झोटे यांनी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे. रक्कम स्वीकारताच तक्रारदाराने पूर्वनियोजित संकेत दिला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत तलाठी झोटे यांना ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर आमोदा परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात महसूल विभागातील लाचखोरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रांवरील नोंदीसाठी लाच मागितल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

एकीकडे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत महसूल विभागातील साध्या कामांसाठीही लाचेची मागणी होत असल्याच्या आरोपामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तलाठी शैलेश झोटे यांच्याविरोधात संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात येत असून, तपासादरम्यान या प्रकरणाशी संबंधित आणखी काही बाबी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.

ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. महसूल अथवा अन्य शासकीय कामासाठी अधिकारी-कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी पुढे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध नडला; जळगावात २८ वर्षीय तरुणाने संपविले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

कूपनलिकेच्या नोंदीसाठी शेतकऱ्याकडून लाच घेताना आमोद्याचा तलाठी रंगेहात जाळ्यात!

October 6, 2026
मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध नडला; जळगावात २८ वर्षीय तरुणाने संपविले जीवन

मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध नडला; जळगावात २८ वर्षीय तरुणाने संपविले जीवन

October 6, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत

October 6, 2026
जळगाव गोळीबार प्रकरणात आठ जणांना घेतलं ताब्यात

तरुण शेतकऱ्याने गावठी कट्ट्यातून स्वतःवर झाडली गोळी; चिनावलमध्ये खळबळ

October 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page